ayurveda college e sakal
नागपूर

'आयुर्वेद’च्या रुग्णांवर उपासमारीची वेळ, जेवणासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील (government ayurveda college nagpur) किचनमध्ये अन्नधान्य तसेच भाजीपाला पुरवणाऱ्या एजन्सीने पुरवठा थांबवला. यामुळे येथील रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मागील पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून येथील स्वयंपाक घर (किचन) बंद आहे. प्रशासन मात्र शासकीय प्रक्रियेत अडकले आहे. गरीब रुग्णांचे नातेवाईक रुग्णांसह स्वतः च्या जेवणाची सोय व्हावी यासाठी भटकंती करत असल्याचे दिसून आले. (patients not getting food in government ayurveda college nagpur)

ॲलोपॅथी उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत. मेडिकलमध्ये प्रचंड गर्दी असते. अशावेळी स्वस्त उपचार मिळतात, यामुळे गरीब रुग्ण सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येतात. विशेष असे की, पक्षाघातासह विविध व्याधी असलेल्यांसाठी आयुर्वेद रुग्णालयाचा आधार आहे. मात्र पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून आयुर्वेद रुग्णालयातील किचनमध्ये गॅस पेटवली गेली नाही. येथे पुरवठादार एजन्सीने भाजीपाला व इतर साहित्याचा पुरवठा थांबवला. यामुळे प्रशासनानेही हात वर केले. रुग्णांना जेवण कसे उपलब्ध होईल, याचा कोणताही विचार केला नाही. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणाची सोय करण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोणतेही ठोस पावले न उचलता शासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू आहे, असे प्रशासन सांगते. सध्या शासकीय आयुर्वेद रुग्णालयात पन्नासपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी भरती आहेत. त्यांचे नातेवाईक जेवणाची सोय करण्यासाठी सायंकाळी भटकंती करीत असल्याचे दिसून आले.

प्रशासन सुस्त - राऊत

शासकीय आयुर्वेद रूणालयात भरती असलेल्या रुग्णांच्या जेवणाची सोय करण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. एजन्सीने पुरवठा थांबवला असला तरी, तात्पुरती सोय करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज होती, मात्र किचन बंद करून केवळ शासकीय प्रक्रिया म्हणून काम करीत आहेत. प्रशासनाने रुग्णांच्या जेवणाची सोय करावी, असे शिवसेनेचे समन्वयक चंद्रहास राऊत म्हणाले.

किचनमध्ये आवश्यक साहित्य पुरवणाऱ्या एजन्सीने पुरवठा न केल्यामुळे किचन बंद ठेवावे लागले. पुरवठा करणाऱ्या एजन्सीला नोटीस दिली आहे. तसेच नव्याने निविदा प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. पुरुषोत्तम राऊत, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT