PCR device at Mayo hospital corrupted 
नागपूर

COVID-19 दुष्काळात तेरावा महीना, या शहरात घडला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना बाधितांचे नमुने तपासण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. असे असताना मेयो येथे उपलब्ध असलेल्या दोनपैकी एक पॉलिमर चेन रिऍक्‍शन (पीसीआर) यंत्र बंद पडले आहे. त्यामुळे कोराना रुग्णांचे नमुने तपासण्याचे काम निम्म्याने कमी झाला आहे. एका यंत्रावर जास्तीत जास्त तीस ते चाळीस नमुने तपासता येणार असल्याने प्रशासनाचा ताण वाढला आहे. 

राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेचे उपकेंद्र मेयो येथे सुरू करण्यात आले आहे. येथे दोन पीसीआर यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. करोनासंशयित आणि बाधितांचे नमुने येथे तपासले जात होते. एका यंत्रावर जास्तीत जास्त चाळीस नमुने दिवसभरात तपासता येतात. दोनपैकी एक यंत्र बंद पडले आहे. त्यामुळे नमुने तपासण्याची क्षमत निम्मी झाली आहे. 

राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ सर्वाधिक संशयित नागपूर शहरात आहेत. मरकजहून आलेल्या 56 यात्रेकरूंना आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. विमानाने प्रवास करणाऱ्यांनासुद्धा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेतर्फे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. संशयितांना विलगिकरण कक्षात दाखल केले जात आहे. त्यामुळे संशयितांच्या संख्येत दिवसेंदिवस भरत पडत आहे. 

अशा परिस्थिती आणखी पीसीआर यंत्राची शहराला गरज आहे. मात्र, दुष्काळात तेरावा महीना म्हणातात तसे झाले आहे. आधीच अपुरी संख्या असलेल्या यंत्रात आणखी घट झाली आहे. विलगीकरण कक्षात 14 दिवस विविध चाचण्या केल्यानंतर त्यांना सुटी दिली जात आहे. सर्वांचे नमुने पीसीआर यंत्रणेच्या माध्यमातूनच तपासले जातात. पीसीआर दिलेल्या निगेटिव्ह किंवा पॉजेटिव्ह अहवाल महत्त्वाचा मानला जातो. 

येथे करणार तपासणी?

नागपूरच्या मेडिकल व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत नुकतेच पीसीआर यंत्र उपलब्ध झाले आहे. येत्या सोमवारपासून या यंत्रावर कोरोना संशयितांचे नमुने तपासणे सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT