people above 45 years vaccinated in nagpur  
नागपूर

लस घेताच समाधानाने फुलले अनेकांचे चेहरे, ८६ केंद्रांवर गर्दी

राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दहशतीत असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी आज शहरातील ८६ लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी केली. लस घेतल्यानंतर समाधानाने अनेकांचे चेहरे फुलल्याचे दिसून आले. 

केंद्र सरकारने आजपासून सरसकट ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर उपाययोजना केल्या होत्या. ४५ वर्षांवरील नागरिकांनी आज पहिल्याच दिवशी लस घेण्यासाठी गर्दी केली. शहरामध्ये ४६ खासगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र आहेत. ५० वर्षीय अ‌ॅड. सूर्यकांत गजभिये यांनी लसीकरणाचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लसीकरण घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नसून लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केन्द्र येथे सकाळी ९ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत दोन पाळीमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. तसेच हंसापुरी आयुर्वेदीक दवाखान्यात देखील लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. याठिकाणी सर्व स्तरातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईउद्दीन व प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सीता कडू यांनी दिली. 

२८ खासगी लसीकरण केंद्रांना मंजुरी - 
केंद्र सरकारने शहरातील आणखी २८ लसीकरण केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्रांत भर पडणार आहे. शहरातील खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. 
 
२२ हजारांवर नागरिकांचे लसीकरण - 
शहरातील ८६ लसीकरण केंद्रावर आज पहिला व दुसरा डोज घेणाऱ्या एकूण २२ हजार ६३ नागरिकांनी लस घेतली. यात पहिला डोज घेणाऱ्यांची संख्या १० हजार ८३५ असून दुसरा डोज घेणारे ११ हजार २२८ जण आहे. विशेष म्हणजे ४५ वर्षांवरील ६ हजार ३३१ नागरिकांनी लस घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT