Nagpur  Pix_Pratik
नागपूर

नागपूरकरांना ना संचारबंदी, ना जमावबंदी, ना कोरोनाची भीती; नागरिक बिनधास्त रस्त्यांवर

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाउन जाहीर केला असला तरी नागपूर शहरात पहिल्या दिवशी त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. विनाकारण फिरणाऱ्यांची श्रुंखला कायम होती. रस्त्यावर बऱ्यापैकी वाहतूक सुरू होती. शहरात जमावबंदी व संचारबंदीचा लागू असताही पोलिसांचाही कुठेच धाक दिसून आला नाही.

हेही वाचा - रुग्णांना दिलासा! नागपुरातील नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटमध्ये शंभर बेड्सच्या कोविड रुग्णालयाचं उदघाटन

कोरोना रुग्णांचा आकडा फुगत चालला असल्याने मुख्यमंत्री लॉकडाउन करायला भाग पाडू नका असा सातत्याने इशारा देत होते. मात्र कोणीच ऐकत नसल्याने दोन दिवसांपासून त्यांनी दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी संपूर्ण राज्यात जाहीर केली. त्यामुळे आजपासून शहरात शुकशुकाट दिसले अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा फारसा प्रभाव शहरात जाणवला नाही. पोलिसांनीसुद्धा विनाकारण अडवणूक होऊ नये म्हणून थोडी शिथिल भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्याचा फायदा अनेकांनी घेतला. त्यामुळे लॉकडाउनचा परिणाम जाणवला नाही.

विदर्भात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूरमध्ये असून मृतकांची टक्केवारीसुद्धा इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे. आज कुठल्याही शासकीय आणि खासगी इस्पितळांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये उपचार घेत आहेत. त्याचा वैद्यकीय सुविधेवर ताण आला आहे.

महापालिका आणि जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. शहरात जंबो बेड सुरू करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी घरीच राहणे अपेक्षित आहे. मात्र तरुणांचे जत्थे टपऱ्यांवर गठ्ठ्याने बसून होते. विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसत होते. त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते.पोलिसांनी विनाकारण फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात काही मोजके चौक वगळता पोलिसांचा कुठेही बंदोबस्त नव्हता.

लॉकडाउनमधून कामगार, अत्यावश्यक सेवा, रेस्टॉरेंटमधून पार्सल सुविधा, शासकीय कर्मचारी, काही खाजही संस्थांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कडक लॉकडाउन जाणवला नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

हेही वाचा - अमरावतीत कोरोनाचं विक्राळ स्वरूप; अंत्यसंस्कारासाठी रांगा; स्मशानात मृतदेह वेटिंगवर

१५ प्रतिष्ठानांवर कारवाई

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी १५ दुकाने व प्रतिष्ठानांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय पथकाने ५९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT