People attention to Nagpur Boardman for social message
People attention to Nagpur Boardman for social message sakal
नागपूर

व्यवस्थेवर जरा हटके बरसणारा ‘नागपूरचा बोर्डमॅन’

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काळेशार वस्त्र, चेहऱ्यावर एखादा आकर्षक आणि गमतीदार मुखवटा आणि हातात उंचावून धरलेला बोर्ड. त्यावर नजर खिळवून ठेवणारा एखादा संदेश. अचानक असा एक तरूण तुम्हाला नागपूर शहरात कुठेही दिसू शकतो. `नागपूरचा बोर्डमॅन` म्हणून तो आता नावारुपाला यायला लागला आहे.

समाजात नाना प्रकारचे लोक असतात. काही जागेवर बसून व्यवस्थेला नाव ठेवतात. काही विरोधात आवाज उचलतात. परंतु या बोर्डमॅनची स्टाईल जरा हटके आहे. त्याला एक वाॅटर व्हेंडिंग मशीन दिसली. त्यावर ठळक अक्षरात २४ तास उपलब्ध लिहिलेले त्याला दिसले. मग या पठ्ठ्याने आपला वेश धारण केला. हाती बोर्ड घेतला. त्यावर ठळक अक्षरात लिहिले, `पहिले हे सुरू तर करा, मग द्या २४ तास पाणी.`व्यवस्थेवर बोट ठेवण्याची त्याची ही अशी मार्मिक आणि हटके पद्धत. सोशल मीडियावर त्याचे `बोर्डमॅन नागपूर` हे अभियान धुमाकूळ घालत आहे.

कोणत्या समस्या हाताळतो

बंद पडलेली सार्वजनिक वॉटर व्हेंडिंग मशीन, सार्वजनिक जागेवर चिकटवलेले पत्रक, बेरोजगारी, संवेदनशील स्थळांवर नागरिकांची सुरक्षा, रखडलेले किंवा बंद पडलेले सार्वजनिक काम.

सकारात्मक बदलाची प्रेरणा

लोकांच्या समस्या सोडविणाऱ्या पात्रावर आधारित चित्रपट पाहिल्यानंतर तो प्रेरित झाला. आपण राहतो त्या शहरामध्ये आपण सकारात्मक बदल घडवून आणायला हवे, या उद्देशाने त्याने ही मोहीम हाती घेतली आहे.

प्रसिद्धीपासून दूर, ओळखही लपवतो

सुपरहिरोप्रमाणे हा बोर्डमॅन आपली ओळख लपवतो. अनेकांना सवंग प्रसिद्धीचा हव्यास असताना हा मात्र प्रसिद्धीपासून दूरच राहतो. परंतु `सकाळ` ने शोध घेतला असृून हा बोर्डमॅन मुळचा चंद्रपूरचा आहे. वडीलांच्या नोकरी निमित्ताने आजवर तो अनेक गावे हिंडला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी आता तो नागपूरमध्ये स्थिरावला आहे. आपल्या शहराइतकीच आत्मीयता तो नागपूर शहरावर दाखवित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT