people enters in NMC only for emergency due to corona in nagpur 
नागपूर

आता अत्यावश्यक कामाशिवाय महापालिकेत प्रवेश नाही, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेत नागरिकांची गर्दी होत असून अधिकारी व कर्मचारीही कोरोना संसर्गाच्या भीतीने त्रस्त झाले आहेत. अखेर आज आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी महापालिकेत येऊ नये, असे आवाहन केले. विविध भागातील नागरिकांच्या प्रवेशामुळे संसर्ग वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना नागरिकांची महापालिकेत वर्दळ कायम असून अधिकारी, कर्मचारी दहशतीत असल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज मनपा मुख्यालय तसेच झोन कार्यालयात अत्यावश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे, असे आवाहन नागरिकांना केले. या संबंधात नुकतेच मिशन बिगीन अगेनअंतर्गत त्यांनी आदेश काढले. मनपा कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तातडीचे कामासाठीच पूर्व परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येईल, असे आयुक्तांनी आदेशात नमुद केले. 

अ‌ॅपवर करा तक्रार -
नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास मनपाचे 'नागपूर लाइव्ह सिटी' मोबाईल अ‌ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. या अ‌ॅपव्दारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्न करणार आहे. कोव्हिड-१९ संबंधी तक्रार असल्यास कोरोना नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अशी सूचनाही त्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT