people faced problem due to incomplete construction of gaddigodam bridge in nagpur 
नागपूर

गड्डीगोदाम रेल्वेपुलाचे काम खोळंबले, दोन महिन्यांपासून वाहतूक बंद असल्याने नागरिक त्रस्त

योगेश बरवड

नागपूर :  उपराजधानीतील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक असलेला कामठी मार्गावर 'यूनिक' रेल्वे पुलाची उभारणी करण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेपुलाखालील संपूर्ण वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. यामुळे नागरिक व वाहनचालकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आले. 

उत्तर नागपूरला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग असलेल्या कामठी मार्गावर दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते. गड्डीगोदाम गुरुद्वाराजवळ याच मार्गावर असलेला संकीर्ण जुना रेल्वेपूल वाहनांच्या वर्दळीसाठी फारच अपुरा ठरत आहे. याच मार्गावरून मेट्रोही धावणार आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता अस्तित्वातील पुलाच्या रुंदीकरणासह वरून पुन्हा वाहनांसाठी पूल व त्यावरून मेट्रो धावणार आहे. यापूर्वी खांबांची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी उंच वाहन अस्तित्वातील रेल्वेपुलाखालून जाताना रुळाखालील गर्डरला धडकले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन महिन्यापासून पुलाखालील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.

एका पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला दोन महिन्याचा कालावधी लागत असल्याने नागरिक त्रासून गेले आहेत. विकास कामांना कुणाचा विरोध नाही. पण, कामांची गती फारच संथ असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यात कामासाठी निश्चित कालावधी न दिल्याने नागरिक संताप व्यक्त करू लागले आहेत. बऱ्याच कालावधीपासून कामे खोळंबलेली दिसून येत आहेत. काहीशी हालचाल सुरू असली तरी ती फारच संथगतीने असल्याने नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. लगतच्या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. 

समस्या अधिकच गंभीर - 
मंगळवारी बाजार हा पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी आहे. पण, वाहनांची गर्दी वाढल्याने दिवसभर वाहतूक कोंडीचे चित्र असते. बाजाराच्या दिवशी ही समस्या अधिकच गंभीर होते. नियमितपणे या मार्गावरून जाणाऱ्यांना सध्या मोठे दिव्य पार पाडावे लागते. त्यातही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेकदा पोलिस कर्मचारी राहत नसल्याने बरेचदा भयावह परिस्थिती निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT