people have not receive money from in last three months through sanjay gandhi niradhar yojana 
नागपूर

निराधारांना तीन महिन्यांपासून सरकारचा आधारच नाही, लाभार्थी झिजवताहेत बँकेच्या पायऱ्या

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर): निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे. परंतु, हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. कोरोना संकटकाळात निराधारांच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आदींचा समावेश आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. ६५ वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरूष, दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या निराधार व आर्थिकदृष्टया असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या योजनेचा लाभ मिळतो. 

कामठी तालुक्यात संजय गांधी निराधार सर्व साधारण लाभार्थी, संजय गांधी निराधार अनुसुचित जाती योजनेतील लाभार्थी, संजय गांधी निराधार अनुसुचित जमाती योजनेतील लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी तर श्रावणबाळ सर्वसाधारण योजनेतील लाभार्थी, श्रावणबाळ अनुसुचित जाती योजनेतील लाभार्थी, श्रावणबाळ अनुसुचित जमाती योजनेतील लाभार्थी अशा दोन्ही योजनेतील एकूण १७ हजारांच्यावर लाभार्थी आहेत. मात्र, त्यांच्या मानधनाची रक्कम बँक खात्यात जमा होते. त्यामुळे निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत जावून अनुदान बँक खात्यात जमा झाले का? अशी विचारणा करीत आहेत. अनुदान अजूनपर्यंत बँक खात्यात जमा झाले नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे तहसील कार्यालयातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार कक्षात येवून अनुदानाविषयी विचारणा करण्यात येते. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत अनुदान आले नाही, असे उत्तर मिळते. तीन महिन्यांचे अनुदान तत्काळ देवून दिलासा देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील मागील तीन महिन्यांची थकीत ग्रॅन्ड प्राप्त झाली आहे. परंतु, योजनेनुसार आवश्यकतेपेक्षा कमी ग्रॅन्ड प्राप्त झाल्याने अतिरिक्त ग्रॅन्डची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. अतिरिक्त ग्रॅन्ड प्राप्त होताच लवकरच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सदर अनुदानाची रक्कम मिळणार आहे, असे नायब तहसीलदार आर. टी. उके यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 1ST ODI: हुशssss जिंकलो यार...! शुभमन गिलने खिंड लढवली, अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी; भारताची मालिकेत आघाडी

Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

Bidkin News : बिडकीनमधून दोन अल्पवयीन सख्खे भाऊ बेपत्ता; पोलिसांची रात्रभर शोधमोहीम, नागरिकांना आवाहन

Power Theft Drive: सावखेडा येथे महावितरणची वीजचोरीविरोधी धडक मोहीम; २४ आकडेबहादरांवर कारवाई, कठोर दंडात्मक गुन्हे दाखल होणार

Disability Law: ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मोठा दिलासा! आता अंतर्गत जखमांनाही अपंगत्व लाभांसाठी पात्र ठरतील; केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT