People opposed police gym construction on Bhagwan Nagar Ground Nagpur  
नागपूर

"साहेब, मग आम्ही खेळायचं कुठे?" भगवाननगर मैदानावरच्या पोलिस जिमला नागरिकांचा विरोध 

नरेंद्र चोरे

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शहरातील मैदाने विकसित करण्यावर जोर देत असतानाच एकेक मैदान कमी होत चालले आहे. याचे जिवंत उदाहरण भगवाननगरातील मैदान आहे. या मैदानावर पोलिस जिम बांधण्यात येणार असल्याने परिसरातील मुले चिंतित आहेत. जिम झाल्यास आम्ही खेळायला जायचे कुठे, असा सवाल स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. 

शहरात सध्या बोटांवर मोजण्याइतकी खेळांची मैदाने शिल्लक आहेत. विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस मैदाने कमी होत चालली आहेत. बॅनर्जी ले-आउट (भगवाननगर) येथील आणखी एक मैदान बळी ठरण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मनपाच्या या मैदानावर लवकरच पोलिस जिम बांधण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तसा फलकही येथे लावण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांचा जिमला तीव्र विरोध आहे. 

जिम झाल्यास परिसरातील मुलांना खेळायला जागा राहणार नाही. या मैदानावर दररोज सकाळ, संध्याकाळ शेकडो मुले क्रिकेट खेळून आपले मनोरंजन करीत असतात. अगदी बॅनर्जी ले-आउटपासून, भगवाननगर, हावरापेठ, नालंदानगर, सावित्रीबाई फुलेनगर, पार्वतीनगर, भीमनगर, कौसल्यानगर, चंद्रनगर, रामेश्वरी, नाईकनगर, वसंतनगर, श्रमजीवीनगर, चंद्रमणीनगर, कैलासनगर, न्यू इंदिरानगर कॉलनीपर्यंतच्या भागांतील मुलांची येथे शाळा भरते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकही वॉकिंग व फिटनेस नियमित करीत असतात. या मैदानावर अनेक स्पर्धा झाल्या व नियमित होत असतात. 

स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरातील या एकमेव मोठ्या मैदानावर बांधकाम झाल्यास मुलांचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. खेळण्यासाठी दोन-चार किमी अंतरावर दुसरीकडे जावे लागेल. सध्या युवा पिढीला मोबाईल व इंटरनेटचे व्यसन लागले आहे, मैदाने नसल्यामुळे या व्यसनात आणखी वाढ होण्याची नागरिकांना भीती वाटत आहे. 

त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम होऊ नये, अशी मागणी मनोज गावंडे, विशाखा बांते, भारती बुंदे व वंदना भगत या चार नगरसेवकांसह श्याम पांडे, शीला बरादिया, मनीष चांदेकर, मुकेश काळे, मुकुंद मलवे, प्रवीण तलहा, अभय गावंडे, अतुल भांगे, शरद बांते, अजय हिवरकर, मंगेश गाखरे, विजय तिरपुडे, अशोक महल्ले, अॅड. आकाश कांबळे, वसंत पिसार, विजय कांबळे, अॅड. राजेंद्र शर्मा, राजेश चाळीसगावकर, प्रदीप सोनुले, राहुल भाजीपाले या स्थानिक नागरिकांनी गडकरी, फडणवीस व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे. प्रस्तावित जिम इतरत्र हलवावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

 संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : मुलुंड आणि भांडुप मधील मेट्रो चारच्या स्पेशल स्टील स्नॅप बसवण्याकरता पुढील दोन दिवस हा रस्ता मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत दोन दिवस बंद असणार

SCROLL FOR NEXT