Permission for transportation of essential goods 
नागपूर

रात्र संचारबंदी सुरू : जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांनाच परवानगी; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

राजेश प्रायकर

नागपूर : साहेबांचा देश इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूने अत्यंत भयंकर असलेला नवा अवतार धारण केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत असलेल्या या संचारबंदीत केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनानाच शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. 

२२ पासून सुरू होणारी संचारबंदी पाच जानेवारीपर्यंत आहे. संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिसांना दिले. महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी आज महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यात बैठक झाली. बैठकीत पोलिस अधिकारी उपस्थित होते. शहरातील महत्त्वांच्या चौकात नाकेबंदी करण्यात येऊन, संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. 

याशिवाय शहरातील आठ नाक्यांवरही विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात पोलिस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्याचा समावेश असून, शहरात येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक,शीघ्र कृती पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. 

वेळ पडल्यास या पथकातील जवानांनाही आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी २ हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. 

निम्मी वाहतूक शाखा रस्त्यावर

रात्रकालीन संचारबंदीदरम्यान वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांसह सुमारे ३५० पोलिस कर्मचारीही शहरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांसह गुन्हेशाखा, आर्थिक गुन्हेशाखा, विशेष शाखेतील पोलिसांनाही बंदोबस्तात तैनात करण्यात आले. बंदेाबस्ताची जबाबदारी गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे देण्यात आली आहे. 

ऑटोचालक सेवेस तत्पर

संचारबंदीबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना सरकार किंवा प्रशासनाकडून ऑटोचालकांना मिळाल्या नाहीत. रुग्ण, रात्री उशिरा रेल्वे, एसटीतून पोहोचणाऱ्या प्रवाशांचा विचार करून ऑटोचा आपत्कालीन सेवेत समावेश करून नियमित सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा विदर्भ ऑटो रिक्षाचालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर व ऑटोचालकांनी व्यक्त केली. 

एसटी फेऱ्या नियमित

सरकारने एटी सेवेबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिल्या नाहीत. यामुळे एसटीसेबा विना व्यत्यय सुरूच राहणार आहे. गणेशपेठेतून रात्री १० नंतर सुटणारी एकच एसटी आहे. याशिवाय रात्री ११ नंतर पोहोचणाऱ्या गाड्यांची संख्या १२ ते १३ आहे. सर्व फेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे बसस्थानकावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

विदेशातून आलेल्यांची माहिती द्या

गेल्या महिनाभरात ब्रिटन, अमेरिकेतून नागपुरात आलेल्या प्रवाशांची माहिती महापालिकेला द्यावी, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. शहरातील ट्रॅव्हल एजन्‍ट्‍सने याबाबत महापालिकेला ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर महिनाभरात विदेशातून आलेल्यांची माहिती देऊन सहकार्य करावे. याशिवाय addlmc-services@gov.in या इमेलवरही माहिती पाठविता 
येईल, असेही आयुक्त म्हणाले. 

अंमलबजावणीसंदर्भात पोलिस आयुक्तांसोबत बैठक
संचारबंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात पोलिस आयुक्तांसोबत बैठक झाली. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना शहरात प्रवेश असेल. एखाद्याला खाजगी वाहनातून दवाखान्यात जाण्यासही परवानगी आहे. परंतु त्यासंदर्भात पुरावे द्यावे लागतील. 
- राधाकृष्णन बी.
आयुक्त, मनपा.

विनाकारण घराबाहेर निघू नका
संचारबंदी बघण्यासाठी युवक रस्त्यांवर येऊन ‘हुल्लडबाजी’ करण्याची शक्यता आहे. या युवकांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये. पोलिसांना सहकार्य करावे. 
- अमितेशकुमार,
पोलिस आयुक्त

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT