नागपूर

नागपूर : पेट्रोल ३९ तर डिझेलमध्ये ३६ वेळा वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मार्च महिन्यापासून १०४ दिवसांत ३९ वेळा पेट्रोल तर ३६ वेळा डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नातून ही बाब समोर आली आहे. यामुळे महागाईत वाढ झाली आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात पेट्रोल १०७ रुपये लीटर झाले आहे. ते ११० रुपये लीटरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Petrol-Diesel-Consistent-increase-in-price-Crude-oil-prices- stabilize-MP-Krupal-Tumane-nad86)

पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर दिसू लागला आहे. महागाई वाढल्याने त्याची झळ सर्वसामान्यांना बसत असल्याने बजेट चांगलेच विस्कळीत झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्या (ओएमसीज) पेट्रोल व डिझेलचे मूल्य निर्धारण करतात असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. १६ जून २०१७ पासून दररोज डॉलर व रुपयाच्या किमतीनुसार पेट्रोल, डिझेलचे दर ठरविले जात आहे.

क्रुड ऑईलच्या किमती स्थिर

तीन वर्षांचा विचार केल्यास क्रुड ऑईलच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. एप्रिल २०१८ मध्ये क्रूड ऑईल ६९.३२ डॉलर प्रति बॅरल होते. एप्रिल २०१९ मध्ये ६६.९५ डॉलर, एप्रिल २०२०मध्ये १९.९० डॉलर पर्यंत निच्चांक गाठला होता. जून २०२१मध्ये क्रुड ऑईलची सरासरी किंमत ७४.३४ डॉलर होती. इंधनाच्या किमतीमुळे महागाईत वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व एलपीजीमुळे त्यात अनुक्रमे १.६०, ३.१० व ०.६४ टक्के इतकी भर पडली आहे याकडे तुमाने यांनी लक्ष वेधले.

(Petrol-Diesel-Consistent-increase-in-price-Crude-oil-prices- stabilize-MP-Krupal-Tumane-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT