Petrol diesel prices will go up Fuel price March is inevitable  sakal media
नागपूर

पेट्रोल जाणार १२० रुपयांवर?; मार्चमध्ये इंधनाची दरवाढ अटळ

भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे. यावरुन इंधनदर वाढीवर सरकारचे नियंत्रण आहे. हे सिद्ध होत असले तरी जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केंद्र सरकार कंपन्यांवर आमचे नियंत्रण नसल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिकांची बोळवण करीत आहे. निवडणुका संपताच पेट्रोल प्रति लिटर १२० रुपयावर जाण्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सौदी अरामकोने मार्च महिन्यासाठी आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे भाव वाढवले आहेत. कंपनीने सर्व कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळेही भाववाढ होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये १४ राज्यांमधील ३० विधानसभा आणि तीन लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तीन नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ८३ दिवस इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर इंधन कंपन्या दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारची भूमिका काय?

१६ जून २०१७ पासून दररोज इंधनाच्या दर निश्चितीचे धोरण तयार करण्यात आले. त्यानुसार साडे चार वर्षात दररोज दरवाढ अपेक्षित होती. निवडणूक नसताना दररोज दरवाढ केली जाते. निवडणुकीच्या रणधुमाळीत ती दरवाढ थांबते. पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात सरकारची भूमिका नाही, असे अनेकदा सरकारकडून म्हटले जाते. मात्र, निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे पेट्रोलियम कंपनीवर सरकारचे नियंत्रण नाही असे म्हणणे म्हणजे पूर्णपणे सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निवडणुका आटोपल्यानंतर दरवाढ

शहरांत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे. शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. सात मार्चनंतर पाचही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आटोपताच पेट्रोलच्या दरात वाढ होण्यास सुरवात होईल आणि १२० ते १२१ रुपये प्रति लिटर पेट्रोलचे दर जातील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सकाळी डोळे उघडले, नोकरी गेल्याच्या मेलचे नोटिफिकेशन दिसले; मेटात 8 हजार कर्मचारी कपातीला सुरुवात

Shivraj Motegaonkar Viral Video : पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या... शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल

Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, तब्बल ४४९ जणांचा बळी

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा

‘जशी स्वामींची इच्छा!’ गश्मीर महाजनी देऊळ बंद 2 मध्ये दिसणार? मोहन जोशी म्हणाले...'सगळे राघव शास्त्रीबद्दल...'

SCROLL FOR NEXT