PI Arvind bhole also involved in Preeti Das case in Nagpur  
नागपूर

वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे ‘लुटेरी दुल्हन’मुळे आला होता चर्चेत; एकामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन  

अनिल कांबळे

नागपूर ः नागपूर शहर पोलिस दलातील सर्वाधिक वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे हा सर्वप्रथम ‘लुटेरी दुल्हन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीतीमुळे चर्चेत आला आहेत. ‘प्रीती’ला पोलिस ठाण्यात पत्नीप्रमाणे वागविणे त्याला महागात पडले. तिच्या मैत्रिणीने भोळेच्या कानशिलात वाजविल्याची चर्चा शहर पोलिस दलात होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भोळे हा नागपूर शहर पोलिस दलात तीन वर्षांपूर्वी रूजू झाला होता. महिलांशी जवळिक साधण्याच्या सवयीमुळे त्याला ठाणेदारी मिळू शकली नव्हती. तो नंदनवन पोलिस ठाण्यात द्वितीय पोलिस कार्यरत असताना एका महिला कर्मचाऱ्याला त्रस्त करीत होता. तिने तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आणि ‘लुटेरी दुल्हन’ नावाने फेमस असलेल्या प्रीती नावाच्या महिलेला हकीकत सांगितली. त्यामुळे त्या महिला पोलिसाची मध्यस्थी करतानाच प्रीतीच त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली. प्रीतीला लग्नाचे आमिष भोळेने दाखवले. त्यामुळे त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती. 

नंदनवन पोलिस ठाण्यात प्रीती आणि तिची मैत्रिण भोळेला भेटायला गेल्या होत्या. दरम्यान भोळेने प्रीतीवर हात उगारला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रितीच्या मैत्रिणीने त्याच्या कानशिलात लगावली होती, अशी चर्चा होती. या प्रकारामुळे नंदनवन पोलिस ठाण्यात मोठा राडा झाला होता. या प्रकरणानंतरच भोळेची पोलिस नियंत्रण कक्षात बदली होती. 

पोलिस उपनिरीक्षकाने दिला फ्लॅट

पोलिस निरीक्षक अरविंद भोळेने गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला पोलिस उपनिरीक्षक काळूसे यांच्या फ्रेंड्स कॉलनीतील फ्लॅटवर नेले. त्याच फ्लॅटमध्ये विधवेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले. गेल्या काही महिन्यांपासूच काळूसे यांच्या फ्लॅटमध्येच तिला ठेवले होते. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT