PI Arvind Bhole was in the news because of Preeti Nagpur crime news 
नागपूर

‘लुटेरी दुल्हन’ प्रीतीमुळे चर्चेत आला होता पीआय अरविंद भोळे; विधवेवर केला बलात्कार

अनिल कांबळे

नागपूर : विधवेवर बलात्कार केल्याने निलंबित झालेला शहर पोलिस दलातील वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यापूर्वी ‘लुटेरी दुल्हन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीतीमुळे वादात सापडला होता. ‘प्रीती’ला पोलिस ठाण्यात पत्नीप्रमाणे वागविणे त्याला महागात पडले. तिच्या मैत्रिणीने भोळेच्या कानशिलात वाजविल्याची चर्चा शहर पोलिस दलात होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भोळे हा नागपूर शहर पोलिस दलात तीन वर्षांपूर्वी रुजू झाला होता. महिलांशी जवळीक साधण्याच्या सवयीमुळे त्याला ठाणेदारी मिळू शकली नव्हती. तो नंदनवन पोलिस ठाण्यात द्वितीय पोलिस निरीक्षक कार्यरत असताना एका महिला कर्मचाऱ्याला त्रस्त करीत होता. तिने तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आणि ‘लुटेरी दुल्हन’ नावाने फेमस असलेल्या प्रीती नावाच्या महिलेला भोळेचे कारनामे सांगितले. त्यामुळे त्या महिला पोलिसाची मध्यस्थी करतानाच प्रीतीच त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली.

प्रीतीला लग्नाचे आमिष दाखविल्याने ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. नंदनवन पोलिस ठाण्यात प्रीती आणि तिची मैत्रीण भोळेला भेटायला गेल्या होत्या. दरम्यान भोळेने प्रीतीवर हात उगारला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रीतीच्या मैत्रिणीने त्याच्या कानशिलात लगावली होती, अशी चर्चा होती. या प्रकारामुळे नंदनवन पोलिस ठाण्यात मोठा राडा झाला होता.

या प्रकरणानंतरच भोळेची पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली होती. तसेच आसावरी नावाची महिला तक्रार नंदनवन ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता भोळेने तिला जाळ्यात अडकविले होते. या महिलेला काही दिवस नंदनवनमधील फ्लॅटवर पत्नीप्रमाणे ठेवून तिलाही सोडले होते, अशी माहिती आहे.

पोलिस उपनिरीक्षकाने दिला फ्लॅट

अरविंद भोळेने गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला पोलिस उपनिरीक्षक काळूसे यांच्या फ्रेंड्स कॉलनीतील फ्लॅटवर नेले. त्याच फ्लॅटमध्ये विधवेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले. गेल्या काही महिन्यांपासूच काळूसे यांच्या फ्लॅटमध्येच तिला ठेवले होते. 

पुण्यातील महिलेला केले ‘ब्लॅकमेल’

पीआय अरविंद भोळे याने पुण्यातील एक महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ काढले. तिचे लग्न झाल्यानंतर तिला भोळे ब्लॅकमेल करायला लागला. ‘तू देहविक्री करतेस. तुझे फोटो माझ्याकडे आहेत. फोटो तुझ्या पतीला दाखवीन असे बोलून ब्लॅकमेल करू लागला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ती महिला नागपूरला आली. २५ नोव्हेंबर २०२० ला पोलिस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी भोळेने तिची माफी मागून तिला परत पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT