pm narendra modi sadden tweet about deceased in well treat hospital fire in nagpur
pm narendra modi sadden tweet about deceased in well treat hospital fire in nagpur 
नागपूर

Well Treat Hospital Fire : मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अमरावती मार्गावरील वाडी येथील वेलट्रीट रुग्णालयात शुक्रवारी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, इतर रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने त्यांचे जीव बचावले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या आगीमध्ये ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांना दुःखात मी सहभागी आहे. तसेच जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

आयुर्वेदतज्ज्ञ असलेले डॉ. राहुल ठवरे यांचे हे रुग्णालय आहे. चार माळयाच्या या रुग्णालय इमारतीच्या पहिल्या माळयावर मेथोडेक्स सिस्टम प्रा. लिमिटेडचे कार्यालय आहे. तर, तळमजल्यावर आयसीआसीआय बॅंकेचे कार्यालय आहे. दोन ते चार माळ्यावर रुग्णालय आहे. दुसऱ्या माळ्यावर अतिदक्षता कक्ष आहे. येथे १६ खाटांची व्यवस्था आहे. या कक्षातील वातानुकूलित यंत्राला आग लागली. त्यानंतर ती पसरत गेली. आग लागल्याचे दिसताच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टींग्वीशरने आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेली. या माळ्यावर एकूण १० रूग्ण भरती होते. यातील सहा रूग्ण स्वत:च रुग्णालयाबाहेर आले तर, उर्वरित ४ रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तिसऱ्या माळ्यावर १७ खाटा होत्या. येथील सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यास जवानांना यश आले. तर, चौथ्या माळ्यावर साधारण कक्ष होता. येथे ५ रूग्ण आणि एक कर्मचारी होता. हे सर्व सुखरूप बाहेर पडले. 

अतिदक्षता कक्षातून आग लागल्यानंतर धूर बाहेर पडल्यानंतर एकच धावपळ उडाली. याच कक्षात भरती असलेल्या चार जणांना गुदमरल्याने मृत्यू झाला. हे नॉनकोव्हिड रुग्णालय होते. 

आगीची माहिती मिळताच वाडी व एमआयडीसी केंद्राचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. त्यापाठोपाठ तीन फायर टेंडरसह आपत्कालीन सेवा पथकासह टीटीएलही दाखल झाले. घटनास्थळावर सर्वप्रथम वाडी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी रोहीत शेलारे पोहोचले. पाठोपाठ पोहोचलेल्या अग्निशमन बंब व कर्मचाऱ्यांनी आग विझविली. तोवर चार निष्पापांचा बळी गेला होता. तर, इतर रुग्णांचाही या आगीमुळे गुदमऱल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने मेयो व मेडिकल रूग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळावर मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, स्थानक अधिकारी तुषार बारहाते, फायरमन शरद दांडेकर रूपेश मानके, शालीक कोठे, चालक शेंबेकर, सुनील डोंगरे आदींनी धाव घेत बचावकार्यात मदत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रूग्ण व जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आमदार समीर मेघे यांना रूग्णांना मदत करण्याचे निदेंश दिले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही फडणवीस यांनी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. 

रुग्ण आणि जखमींना सर्वतोपरी मदत करा - फडणवीसांच्या सूचना 
वाडी येथील वेलट्रीट हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीची तत्काळ दखल घेत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समीर मेघे यांना या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशीही संपर्क साधून याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT