Police and women in a car 
नागपूर

पोलिसाने तिला कारमध्ये निर्जन स्थळी नेले आणि सुरू झाले "डान्सिंग कार'

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा "डान्सिंग कार'चे प्रकरण उघडकीस आले. मागच्या वेळी मेडिकल परिसरात घडलेल्या एक डॉक्‍टर आणि दुसऱ्या प्रकरणात वकील "डान्सिंग कार'मध्ये आढळले होते. तर यावेळी चक्‍क पोलिस कर्मचारी आणि महिला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी कारमधून दोघांनाही बाहेर खेचून काढले. दोघांचेही फोटो, व्हिडिओ आज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

या घटनेमुळे पोलिस विभागाची प्रतिमा धुळीस मिळाली असून यावर वरिष्ठ काय कारवाई करतात? यावर सर्वांचे लक्ष आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला एक पोलिस शिपाई मंगळवारी आपल्या कारने हुडकेश्‍वर-बेलतरोडी परिसरात गेला होता.

त्याच्यासोबत एक महिलासुद्धा होती. रस्त्यावर अंधारात अचानक कार थांबली. "डान्सिंग कार'चा प्रकार उजेडात आल्यामुळे अनेक जण आश्‍चर्यचकित होऊन जण कारजवळ थांबले. नागरिकांना संशय आल्यामुळे काही टारगट युवकांनी कारच्या काचामधून डोकावून पाहिले असता भलताच प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. दरम्यान नागरिकांची बरीच गर्दी जमून आली.

नागरिकांनी कारचा दरवाजा ओढत दोघांनाही बाहेर काढले. अघटित प्रकार आढळल्यामुळे अनेकांनी पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली तर कुणी पोलिस विभागाची लक्‍तरे वेशिला टांगली. काहींनी व्हिडीओ आणि फोटो काढले. यावेळी मात्र पोलिस कर्मचारी शांत उभा होता तर महिला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती.

मात्र, नागरिकांनी तिला पळून जाऊ दिले नाही. काही सुज्ञ नागरिकांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या प्रकाराची आज पोलिस दलात आणि शहरात मोठी चर्चा होती.

पोलिस विभागाची प्रतिमा डागाळणारा पोलिस कर्मचारी वादग्रस्त आहे. काही वर्षांपूर्वी त्याने एका आरोपीला न्यायालयातून घरी नेले होते. त्या प्रकरणात त्याला निलंबितसुद्धा करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

Mandwa Gateway Ferry Suspension: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान मांडवा-गेटवे जलवाहतूक पूर्णपणे बंद

Jayant Patil Petrol Price Statement : 'पेट्रोल 130 रुपयांवर जाईल, देशात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची भीती...'; आमदार जयंत पाटील यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT