Police come late to the place of interest 
नागपूर

पोलिस अधिकाऱ्यांची चलाखी; आवडीच्या ठिकाणी होतात उशिरा रुजू

अनिल कांबळे

नागपूर : आवडीच्या ठाण्यात बदली झाल्यावर तेथे आणखी काहीकाळ राहाता यावे यासाठी अनेक पोलिस अधिकारी उशिरा रुजू होतात. बदलीचा वहित कालावधी टळल्याने पुढील वर्षीच बदलीसाठी विचार केला जातो. हा फंडा अनेक अधिकारी वापरत असल्याचे समोर आले आहे. 

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने सर्वसाधारण बदल्यांसाठी (जीटी) तीन वर्गवारी ठरविल्या जातात. यामध्ये विहित कालावधी पूर्ण झाल्याने बदली होणे, कालावधी पूर्ण नसल्यानंतरही मुदतपूर्व बदलीसाठी लेखी विनंती आणि प्रतिकुल अहवालावरून बदली करण्यात येते. ज्या पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कालावधी पोलिस परीक्षेत्रात आठ वर्षे, मुंबई आयुक्‍तालयात 8 वर्षे मुंबई व्यतिरिक्‍त आयुक्‍तालयात 6 वर्षे सेवा बजावली आहे, अशा पोलिस अधिकाऱ्यांची बदलीची यादी 31 मे या तारखेपूर्वीच मागविण्यात येते. याच तारखेला बदलीसुद्धा केली जाते. 

मात्र, बदली झालेल्या ठिकाणावर केव्हा रुजू व्हावे, याबाबत पोलिस अधिकारी आपापल्या सोयीने निर्णय घेतात. जर आवडीच्या शहरात बदली झाली असेल तर बुद्धीचातुर्याचा वापर करणारे पोलिस अधिकारी जाणूनबुजून 10 ते 20 दिवस उशिरा रुजू (आमद) होतात. त्यामुळे रुजू झाल्याच्या दिनांकापासून त्या पोलिस अधिकाऱ्याची सेवा ग्राह्य धरली जाते. उशिरा रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे परीक्षेत्रात 6 वर्षांच्या सेवेचा कार्यकाल पूर्ण न झाल्याचे दर्शविण्यात येते. त्यामुळे तो अधिकारी पुन्हा एका वर्षांपर्यंत सार्वत्रिक बदलीस पात्र ठरत नाही. 

पोलिस अधिकाऱ्यांच्या सुपिक डोक्‍यातून निघालेल्या क्‍लृप्तीमुळे जवळपास एका वर्षाचा कालावधी आवडत्या शहरात घालवायला मिळत असल्याने अन्य अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होते. अनेक अधिकारी बदल्यांबाबत नाराजी व्यक्‍त करतात. पोलिस अधिकाऱ्यांची ही चलाखी ओळखून गृहमंत्रालयाने बदली झालेल्या दिवसापासूनच सेवेचा कार्यकाल ग्राह्य धरल्यास वेळेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

वरिष्ठ सोडत नाहीत हो...

जर पोलिस अधिकाऱ्याची बदली नावडत्या ठिकाणी (गडचिरोली किंवा नक्षलग्रस्त भाग) झाल्यास तर लगेच बदलीच्या ठिकाणी आमद दिली जाते. जेणेकरून सार्वत्रिक बदलीच्या (जीटी) यादीत लगेच समावेश व्हावा. परंतु, अनेकदा पोलिस उपनिरीक्षक किंवा सहायक निरीक्षकांना वरिष्ठ पोलिस अधिकारी बदली होताच "रिलिव्ह' करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना उशिरा रूजू होण्याचा फटकाही बसतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीआधी महाराष्ट्रात हाय अलर्ट! गुप्तचर संस्थांचा इशारा, मुंबई पोलिसांची मोठी तयार

Mumbai News: गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुलं राहणार 'जिजामाता उद्यान', पण या दिवशी बंद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Updates: बीडच्या गेवराईत हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमनेसामने

PM Narendra Modi: ''पंतप्रधान मोदींच्या 'डिग्री'चे तपशील सार्वजनिक करण्याची गरज नाही'', दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai Politics: निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबतं! शिंदेसेनेत मोठी इनकमिंग, शरद पवारांसह राज ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT