police commissioner upadhyay says Our watch on every criminal  
नागपूर

पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय काय म्हणतात कोरोना व लॉकडाउनबाबत, वाचा...

अनिल कांबळे

नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील प्रत्येक चौकात खाकी वर्दीधारी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे डोके ठेचण्यासाठी आम्ही "स्पेशल ऑपरेशन' राबवित असून प्रत्येक गुन्हेगारांवर "वॉच' ठेवून आहोत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. 

चार महिन्यांत कोरोनामुळे शहरातील वातावरण आणि स्थिती बदलली आहे. लॉकडाउन जसजसा शिथिल होतो, तसतसे गुन्हेगार डोके वर काढतात. संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा बंदोबस्त बघण्यासह गुन्हेगारांवरही नियंत्रण ठेवण्याचे दुहेरी आव्हान आमच्यासमोर आहे. त्यासाठी सकाळपासून आमचे अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यांवर आहेत.

डॉ. उपाध्याय म्हणाले, खरं तर आज नागपूरकरांचे आभार मानले पाहीजे. कारण, प्रशासनाने केलेल्या आवाहनाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज कुणीही विनाकारण बाहेर फिरताना दिसत नाही. जे कुणी केवळ जनता कर्फ्यू कसा आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडत आहेत, त्यांना आम्ही विनंती करून पुन्हा परत पाठवित आहोत. अगदीच कुणी कर्फ्यूचे नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला "प्रसाद' देण्यासाठीही मागेपुढे पाहिले जाणार नाही. कुणीही सहज म्हणून घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. असे केले तरच आपण भविष्यात कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होणार आहोत. 

फिक्‍स पॉईंट आणि वाहने

बंदोबस्तात प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी 24 तास कर्तव्यावर असणार आहेत. शहरात 150 फिक्‍स पॉईंट लावलेले आहेत तर 175 वाहने सतत पेट्रोलिंग करीत आहेत. पोलिस अधिकारी, कर्मचारी, कमांडो, आरसीबी पथकासह चार ते पाच हजार लोक या बंदोबस्तासाठी कामी लागले आहेत. येवढे मोठे मनुष्यबळ केवळ लोकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी लावले आहे. याचा विचार सुज्ञ जनतेने केला पाहिजे. लोकांनी स्वयंशिस्त पाळली तर हे मनुष्यबळ दुसऱ्या विधायक कामांत लागू शकते. नागरिकांनी प्रशासनाला, पोलिसांना सहकार्य करावे आणि कोरोनाच्या लढ्यात एक योद्धा म्हणून आपले योगदान द्यावे, असे आवाहनही डॉ. उपाध्याय यांनी केले आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT