Police misbehaved with his wife in Nagpur Latest News  
नागपूर

पोलिस पतीच झाला वैरी! न्याय मागणार तरी कोणाकडे? उपराजधानीत घडला धक्कादायक प्रकार  

अनिल कांबळे

नागपूर:  विकृत मानसिकता असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीला मोबाईलवर अश्‍लील व्हिडीओ दाखवून बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर त्याच्या नातेवाईकांनी महिलेला माहेरून हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. 

ही धक्कादायक बाब समोर आली असून पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध, अनैसर्गिक कृत्य, हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला. निखिलेश असे आरोपी कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचारी निखिलेश ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहे. त्याने फेसबूकवरून नागपुरात राहणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमसंबंधानंतर जानेवारी २०१९ ला २९ वर्षीय तरुणीचे पोलिस कर्मचाऱ्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर पोलिस कर्मचारी व त्याच्या नातेवाइकांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. अश्लील चित्रफित दाखवून कर्मचारी तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करायला लागला. 

पत्नी गर्भवती असताना त्याने तिच्या पोटावर लाथ मारली.त्यामुळे तिचा गर्भपात झाला. सतत होत असलेल्या छळाला कंटाळून पत्नीने अजनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस कर्मचारी व त्याच्या नातेवाइकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

अद्याप गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती अजनी पोलिसांनी दिली. हा पोलिस कर्मचारी कुख्यात आहे. त्याच्याविरूद्ध जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. नागपूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून त्याने चार लाख रूपये उकळले होते, अशीही माहिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्यातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी; पोलिस उपायुक्ताकडून आदेश जारी

Nanded Bhokar Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर ट्रक-टाटा मॅजिकची भीषण धडक; 5 जण जागीच ठार, 8 जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

SCROLL FOR NEXT