नागपूर : गोपालनगरातील पॉश वसाहतीत फिजिओथेरेपी सेंटरच्या (physiotherapy center)नावाखाली कुंटनखाना (sex racket) सुरू होता. प्रतापनगर पोलिसांनी (pratapnagar police nagpur) गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणले. (police raid on sex racket in gopalnagar of nagpur)
दीनदयालनगर, गोपालनगरा तिसरा बसस्टॉप येथील भाजीबाजार येथे धनवंतरी क्लिनिकच्या वर ड्रिमटच ग्लोबल हेल्थ सेंटर नावाने हे फिजिओथेरेपी सेंटर आहे. मेडिकल चौकानजीकच्या चंदननगरातील रहिवासी दयालदास लहेरे (२९) हा हे सेंटर चालवितो. अॅक्यूप्रेशर व मसाजच्या नावाखाली तो ग्राहकांच्या मागणीप्रमाणे युवती पुरवित होता. पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांनी प्रतापनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पोलिस पथक तिथे पोहोचले. पंटरच्या मदतीने सापळा रचण्यात आला. वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी धाड टाकली. येथून एका युवतीची सुटका करण्यात आली.
आरोपी लहेरे याला फिजिओसेंटरमधून कसल्याही प्रकारचे उत्पन्न होत नव्हते. वेश्या व्यवसायाच्या कमाईवरच उपजिविका भागवित होता. ग्राहकांना प्रतीतास २ हजार रुपये आकारले जात होते. प्रत्येक ग्राहकामागे युवतींना केवळ ५०० रुपये द्यायचा, तर उर्वरित दीड हजार रुपये तो स्वतः ठेवायचा. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.