file photo 
नागपूर

सावधान! मास्क न वापरणाऱ्यांवर आता पोलिसही करणार कारवाई 

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात कोरोनाची स्थिती गंभीर असून दररोज बाधित रुग्ण तसेच बळींची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू असून, यात आता मनपा व पोलिसही एकत्र येऊन काम करणार आहे. मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर आता पोलिसही कारवाई करणार आहेत. 

पोलिस आयुक्त कार्यालयात महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांवर बंधनाची गरज व्यक्त केली. मनपाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सोबत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता भर दिला जात आहे. पोलिस आयुक्तसुद्धा मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम सुरू करीत आहेत. पोलिस आयुक्तांसोबत ‘जनता कर्फ्यू’संदर्भात पण चर्चा झाली. कोरोनाविरोधात एकत्रित लढा उभारून कोरोनाला नागपुरातून हद्दपार करायचे, असेही बैठकीत ठरले. कोरोनायोद्धा असलेल्या पोलिसांना जर कोरोनाचे संक्रमण झाले तर त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भातही पावले उचलत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी या वेळी सांगितले. 

मास्क न लावणाऱ्या ५०१ जणांवर दंड 
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मास्क न लावता फिरणाऱ्या ५०१ जणांवर आज दंडात्मक कारवाई केली. एकाच दिवशी एक लाख रुपये दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ११३६ नागरिकांविरुदद्ध केलेल्या दंडात्मक कारवातून २ लाख २७ हजार रुपये वसूल करण्यात आले. 
सोमवारी शोध पथकाने लक्ष्मीनगर झोनमध्ये २६, धरमपेठमध्ये १०२, हनुमाननगरमध्ये ४३, धंतोलीमध्ये ५२, नेहरूनगर झोनमध्ये ४० जणांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारला. गांधीबाग झोनअंतर्गत ३८, सतरंजीपुरा झोनमध्ये १८, लकडगंज ५०, आशीनगर ६२, मंगळवारी झोनमध्ये ६३ जणांवर कारवाई करण्यात आली. महापालिका मुख्यालयातही ७ जण मास्कशिवाय आढळून आले.

संपादन-मेघराज मेश्राम
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT