politics is started for 16 seats of ZP Nagpur 
नागपूर

‘गाव बसा नही की लुटेरे आ गये’; जिल्हा परिषदेचे राजकारण सुरू; इच्छुकांकडून मोर्चे बांधणी

निलेश डोये

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील १६ जागांसाठी नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहे. परंतु काहींनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने निवडणुकांबाबत अद्याप संभ्रम आहे. परंतु, दुसरीकडे संधीचा फायदा घेत इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. ‘गाव बसा नही लुटरे आ गये’, या म्हणीप्रमाणे जिल्हा परिषदेचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषदेतील राजकीय आरक्षण ५० टक्‍क्यांच्यावर गेले. एस.सी..एस.टी. च्या जागा कमी करता येत नसल्याने ओबीसींच्या जागा कमी करून आरक्षण ५० टक्केमध्येच बसविण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसींच्या सर्वे जागा रिक्त करून अतिरिक्त जागा सर्वसाधारण वर्गात टाकून यासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निकाला दिले. 

निकालाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाही सुद्धा सुरू केली आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे न्यायालयाचा निर्णय असल्याने लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचीही चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला काही सदस्यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यावर काय निकाल लागतो, याकड सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु दुसरीकडे इच्छकांनी उमेदवासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. 

काही नेत्यांकडून विरोधी पक्षांमधील सदस्यांसोबत संपर्क साधून त्यांच्याकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. रद्द झालेल्या सदस्यांच्या आपल्या तिकिट मिळण्यासाठी काहींकडून प्रयत्न होत असून वरिष्ठांकडे दावाही सादर करण्यात येत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी सदस्यत्व रद्द झालेल्यांना पुन्हा तिकिट मिळणार नसल्याचीही चर्चा आहे.

पालकमंत्र्यांकडून निवडणुकीचे संकेत

पालकमंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत बैठक घेतली. कोरोना व आचारसंहिता यासारख्या बाबींचा विचार करून यासंदर्भात तातडीने निधीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. आचारसंहिता आता फक्त जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच लागू शकते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT