नागपूर

पर्यावरणात दरवळतेय कर्तव्याची ‘सुरभी’!

राजेश प्रायकर

नागपूर : सुरभीने पर्यावरण शास्त्रात एमएससी केले असून ती सुवर्णपदक विजेती आहे. शहरात पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करीत असलेली ‘ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि सुरभी जैस्वाल असे समीकरणच झाले. फाउंडेशनची ती टीम लिडर असून होळी, दिवाळीला पर्यावरणाबाबत जनजागृतीसह वर्षभर विविध उपक्रम राबवीत असते. कधी रेडिओच्या माध्यमातून तर कधी प्रत्यक्ष चौकांमध्ये सहकाऱ्यांसोबत उभे राहून नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत आहे. एवढेच नव्हे दरवर्षी गणेशोत्सवातील दहाही दिवस ती सहकाऱ्यांसोबत फुटाळा तलावात कुणी निर्माल्य टाकू नये, यासाठी उभी असते. तसेच टाकलेले निर्माल्य गोळा करतात. त्यामुळे काही वर्षांत फुटाळा तलावात ऑक्सिजनच्या पातळीत वाढ झाली.

पौर्णिमादिनी परिसरातील विद्युत दिवे बंद करण्याच्या महापालिकेच्या उपक्रमात तिचा पुढाकार असतो. पर्यावरणाबाबत मोठ्या प्रमाणात काम करतात रिवा एन्व्हायरो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडमधील तिच्या नोकरीदरम्यानच्या कर्तव्यांनाही ती विसरत नाही. यासाठी आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे तिने नमुद केले.

आतापर्यंत सुरभीला अर्थ डे नेटवर्कचा राईजिंग स्टार पुरस्कार, यशवंत भारती लोककल्याण संस्थेचा विदर्भ भूषण, एका वाहिनीचा नागपूर सन्मान, महाराष्ट्र ज्योती गौरव, महापालिकेकडून जलमित्र, वृक्षमित्र पुरस्कारासह २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. पर्यावरण अभियांत्रिकी, कचरा प्रक्रिया, कचऱ्याचे वर्गीकरण यात नोकरीच्याही मोठ्या संधी असल्याचे सुरभीने नमुद केले. परंतु याबाबत अधिक जनजागृती होत नसल्याने अनेकजण या क्षेत्राकडे वळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

सातत्याने जनजागृती

शहरातील तलावाची स्वच्छता असो की पर्यावरणाबाबत चर्चा, सुरभी जैस्वाल या तरुणीच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरातील पर्यावरणाच्या चिंतेतून गेल्या एका दशकापासून सुरभी सातत्याने जनजागृती करीत आहे. पर्यावरण क्षेत्रातील तिच्या कार्याची दखल घेत आतापर्यंत अनेक पुरस्कारावर तिने मोहोर उमटविली.

पर्यावरणाबाबत शासनाचे धोरण आणि नागरिकांमध्ये एक दुवा म्हणून काम करते. जनजागृती करताना लोकांचा अडथळा येतो. पण माझे काम प्रामाणिकपणे करते. त्यामुळेच आज फुटाळा तलावात लोक निर्माल्य फेकत नाही. निश्चितच शहरात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे समाधान आहे.
- सुरभी जैस्वाल, टीम लिडर, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT