post graduate and failed student exam will conduct in their own colleges of nagpur university 
नागपूर

बॅक बेंचर्सचे भाग्य उजळणार! पदव्युत्तर, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयातच

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक घोषित केले. यामध्ये सर्व पदवी अभ्यासक्रमातील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा २० मार्चपासून सुरू होणार आहेत. मात्र, विद्यापीठाद्वारे यावर्षी सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह बहिःशाल आणि तिसऱ्या, पाचव्या सेमिस्टरमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यामधील बॅक बेंचर्सचे भाग्य उजळणार असल्याचे दिसून येत आहे. 

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आली. या परीक्षानंतर महाविद्यालयस्तरावर इतर सेमिस्टरच्या परीक्षा घेण्यात आल्यात. या परीक्षांमध्ये महाविद्यालयांकडून भरभरुन गुण देण्यात आले. त्यामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होते, त्यांनाही पास होता येणे शक्य झाले. विशेष म्हणजे अंतिम वर्षाचा निकालातही अशीत वाढ दिसून आली. आता विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचा तारखा घोषित केल्या आहेत. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा वगळता, इतर परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, त्यामध्ये विद्यापीठाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांसह बहिःशाल आणि सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे याचा फायदा बॅक बेचर्स विद्यार्थ्यांना होणार आहे. या सर्व परीक्षा ऑनलाइन आणि एमसीक्यू पद्धतीने होणार असून प्रात्यक्षिक असाइमेंट, सेमिनार आणि वर्कशॉपच्या माध्यमातून ऑनलाइन, ऑफलाइन आणि मिक्समोडमध्ये घेण्यात येणार आहे. यामुळे जवळपास सर्वच पास अशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याती शक्यता नाकारता येत नाही. 

सोशल मीडियावर बनावट पत्र -
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत काल हिवाळी परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, २०२० च्या हिवाळी परीक्षा मार्च २०२१ मध्ये घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी अद्याप कुठलाच आदेश निघाला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सायंकाळी विद्यापीठाकडून सविस्तर पत्र काढण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT