By Pramod Phulkar Potato farming flourished through planning and hard work Farmers news 
नागपूर

Success Story : पीक बदल, नियोजन, परिश्रमातून फुलविली बटाट्याची शेती; फुलकरांचा यशस्वी प्रयोग

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर) : पारंपरिक पिकांना फाटा देत कोतेवाडा येथील प्रमोद कृष्णराव फुलकर या प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून बटाट्याची शेती फुलविली आहे. नियोजनबद्ध शेती केल्यास कुठल्याही पिकातून चांगले उत्पादन घेता येते, असा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. सोबतच हिंगणा तालुक्यात बटाटा पीक चांगल्या प्रकारे घेतले जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. दीड एकरातील शेतीमध्ये फुलकर यांनी केलेल्या नियोजन आणि परिश्रमाला आता उन्नतीचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा येथील ४६ वर्षीय प्रमोद कृष्णराव फुलकर यांनी सोंडापार शिवारामध्ये असलेल्या शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत दीड एकर शेतीमध्ये तांत्रिक मार्गदर्शन व योग्य नियोजन करून बटाट्याची लागवड केली. शेणखताचा वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्याने झाडांची सध्या चांगली वाढ झाली आहे.

पिकाला सध्या एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून, जवळपास दोन ते तीन महिन्यांनी पीक काढणीवर येणार आहे. दीड एकरात लावलेल्या बटाट्याचे त्यांना दोन ते सव्वा दोन लाख रुपयाचा निव्वळ नफा होण्याचा अंदाज आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता फुलकर यांनी पीक बदल केला. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पीक बदल ठरतोय फायद्याचा

बियाणे खरेदी, लागवड खर्च, खत व इतर खर्च यावर फुलकर यांना ३० ते ३५ हजार खर्च झाला. इतर पिकांच्या तुलनेत बटाटा हे पीक कमी खर्चाचे व कमी मेहनतीचे असल्याचे फुलकर यांना प्रत्ययास येत आहे. बटाट्याची शेती लाखमोलाची ठरणार असल्याचे फुलकर सांगतात.

शेतीला रंगबिरंगी ‘कुंपण’

शेतातील पिकांचा वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांपासून बचाव व्हावा, यासाठी फुलकर यांनी शेताचे बांध रंगीबेरंगी साड्यांनी सजविले आहे. निसर्गाच्या हिरव्या रंगात हे रंगबिरंगी कुंपण लक्षवेधी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT