President wants to be MLA, allegations of members of Marathi Film Corporation
President wants to be MLA, allegations of members of Marathi Film Corporation 
नागपूर

अध्यक्षांना आमदारकीचे स्वप्न, मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांचा आरोप

केतन पळसकर

नागपूर  : व्ही. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली साठच्या दशकात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ स्थापन झाले. कलावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी या महामंडळाचा मोठा वाटा आहे. मात्र, महामंडळाचे अध्यक्ष आमदारकीचे स्वप्न पाहण्यात मग्न असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या कार्यकारिणीचा कार्यकाळ पुढील महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे कार्यकारिणीची बैठक घेऊन निवडणुकीच्यादृष्टीने समिती स्थापन करणे अपेक्षित आहे. मात्र, वर्षभरामध्ये केवळ दोनच बैठका झाल्या असून अध्यक्ष जाणून बुजून बैठक आयोजित करीत नाहीत. ते महामंडळाचा विचार करण्याऐवजी आत्मकेंद्री झाले आहेत. महामंडळाचे हीत जोपासण्यापेक्षा आमदार कसे होता येईल याचे स्वप्न अध्यक्ष रंगवीत आहेत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे कार्यकारिणीमधील १४ पदाधिकाऱ्यांपैकी आठ जणांनी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. 


कोरोनाचे कारण देत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले बैठका घेणे टाळत आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणतेही विधायक काम झाले नाही. चित्रपटाला अनुदान मिळवून देण्यासाठी महामंडळ काहीही करू शकले नाही. पाच वर्षांमध्ये काही होऊ शकले नाही; मग सहा महिन्यांत असे काय होणार? 
-विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेते, प्रदेश उपाध्यक्ष, सांस्कृतिक आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

निवडणुकीच्यादृष्टीने कार्यकारणीची बैठक होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, अध्यक्ष मनमानी कारभार करत आहेत. कोणत्याही विषयात कार्यकारणीचे मत विचारात घेतले गेले नाही. कायदा हातात घेऊन महामंडळ एकट्याच्या मालकीचे असल्यासारखा त्यांचा तोरा आहे. 
- सतीश रणदिवे, संचालक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. 

विरोधक विरोधासाठी असे आरोप करीत आहेत. आमची मुदत अद्याप संपली नाही. मुदतीच्या आधी सर्वसाधारण समिती आणि संचालक मंडळांचीही बैठक घेतली जाईल. सर्वसाधारण सभेमध्ये सातशे ते आठशे सभासद उपस्थित असतात. त्यामुळे, तांत्रिकदृष्ट्या ऑनलाइन बैठक घेणेही शक्य नाही. विरोधकांना घाई असल्यास त्यांनी बैठकीसाठी परवानगी मिळवून द्यावी. 
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT