Principal Fraud sakal
नागपूर

Principal Fraud: हिंगणा आयटीआय प्राचार्याने विद्यार्थ्यांना बनावट पावत्या देऊन ४०.४५ लाख रुपये लंपास केले

Nagpur Crime: हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी आयटीआयच्या प्राचार्याने विद्यार्थ्यांकडून बनावट पावत्या देऊन ४० लाख ४५ हजार रुपये लंपास केले. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी आयटीआयच्या प्राचार्याने विद्यार्थ्यांना बनावट पावत्या देऊन ४० लाख ४५ हजार रुपये लंपास केले.

याप्रकरणी संस्थाचालक सूरज मेघराज ताजणे (वय ५३, रा. गांधीनगर, हिंगणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केला.

कपिल मोरेश्‍वर मानकर (वय ३२, रा. कचारी सावंगा, काटोल) असे प्राचार्याचे नाव आहे. डोंगरगाव परिसरात मेघसाई खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत कपिल मानकर गटनिदेशक प्राचार्य म्हणून काम करीत होते.

त्यांनी ८ जुलै २०२३ ते ७ मार्च २०२५ दरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे शुल्क घेत बनावट पावत्या दिल्या. या शुल्कातून आलेल्या ४० लाख ४५ हजार २०० रुपयांचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग केला.

ऑडिटमध्ये शुल्काचे पैसे जमा झाले नसल्याचे आढळून आले. ही बाब लक्षात येताच संस्थाचालकांनी चौकशीसाठी समिती तयार केली. या समितीकडून प्राचार्याने पैसे त्या वर्षीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट पावत्या दिल्याची माहिती समोर आली. त्यावरून त्यांच्याविरोधात अहवालाच्या आधारे हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs NZ 2nd Test: न्यूझीलंडच्या ९५ वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच असे घडले! १९८६ मध्ये भारतीयांनी केला होता असा पराक्रम...

Shiv Sena : महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा असेल, उदय सामंताचे कोल्हापुरात कोणाला आव्हान

Raksha Bandhan 2025: आजच्या दिवशी येऊ शकतो भावंडांच्या नात्यात तणाव, जाणून घ्या वाद टाळण्याचे सोपे मार्ग

Robert Kiyosaki: 'कोणीही करोडपती बनू शकतो', रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, फक्त ही एक गोष्ट करा

Virar : मित्रासोबत जीवदानी मंदिरात गेली, भूत उतरवण्यासाठी भोंदूबाबानं लॉजवर नेलं; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विरारमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT