The principal will go to court against the fee determination 
नागपूर

शुल्कनिर्धारणाविरोधात प्राचार्य फोरम जाणार न्यायालयात; महाविद्यालयांना आर्थिक फटका

मंगेश गोमासे

नागपूर : सामाजिक न्याय विभागाने जानेवारी महिन्यात शासन निर्णय काढून अनुदानित आणि विना अनुदानित महाविद्यालयांना १६ प्रकारचे शुल्काचा परतावा देण्याचे ठरविले. मात्र, या प्रकाराने विदर्भातील विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत असल्याची बाब समोर आली आहे. या विरोधात आता विद्यापीठातील प्राचार्य फोरम न्यायालयात दाद मागणार आहे.

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश देताना २८ प्रकारचे शुल्क आकारल्या जाते. यांपैकी १२ प्रकारचे शुल्क हे विद्यापीठात जमा करावे लागते. हे सर्व शुल्क मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीतून महाविद्यालयांना प्राप्त होत असते. मात्र, जानेवारी २०२० ला सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय काढून शुल्काची पुनर्रचना केली. या पुनर्रचनेत २८ वरून शुल्काची संख्या १६ वर आणण्यात आली. त्यामुळे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उर्वरित शुल्क शिष्यवृत्तीतून मिळणार नाही.

विशेष म्हणजे नागपूरसह विदर्भातील विद्यापीठात संगणक प्रशिक्षण शुल्क, युथ फेस्टिव्हल शुल्क, विविध गुणदर्शन आणि उपक्रम शुल्क तसेच विमा निधी हे शुल्क घेण्यात येत नाही. याउलट पश्चिम महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये हे शुल्क घेण्यात येतात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९-२० या सत्रातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीत ई-सुविधा, वैद्यकीय अर्ज, नामांकन, आपत्ती व्यवस्थापन, विद्यार्थी कल्याण निधी, वार्षिक शुल्क असे एकूण ३२० रुपये प्रति विद्यार्थी जमा झालेले नाही.

दुसरीकडे महाविद्यालयांना सरकारी नियमाप्रमाणे हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूलही करता येत नाही. या प्रकाराने विद्यार्थ्यांना या शुल्कास मुकावे लागणार आहे. त्यामुळे या विरोधात प्राचार्य फोरम न्यायालयाकडे दाद मागणार आहे अशी माहिती प्राचार्य फोरमचे सचिव डॉ. आर.जी. टाले यांनी दिली आहे.

महाविद्यालयांना आर्थिक फटका

नव्या शुल्क निर्धारणामुळे अनुदानित महाविद्यालयांना प्रती विद्यार्थी ५७० तर विनाअनुदानित महाविद्यालयांना १ हजार ६९० रुपयाचे नुकसान होत आहे. प्राचार्य फोरमच्या माहितीनुसार ३ हजार क्षमता असलेल्या अनुदानित महाविद्यालयात प्रत्येक वर्षी १७ लाख १० हजार तर विनाअनुदानित महाविद्यालयांना ५० लाख ७० हजारात फटका बसतो आहे. याउलट संस्थांना आपल्या खिशातून विद्यापीठांना निधी द्यावा लागत आहे. 

अनुदानित महाविद्यालय (प्रती विद्यार्थी ५७०) 
विद्यार्थी संख्या- होणारे नुकसान 
५००-२,८५,००० 
१०००-४,७०,००० 
२०००- ११,४०,००० 
३०००- १७,१०,०००
 

जाणून घ्या - काँग्रेस अन् राष्ट्रवादीच्या मैत्रीमध्ये फूट पडतेय का? 
विनाअनुदानित महाविद्यालय (प्रती विद्यार्थी १ हजार ६९० ) 

विद्यार्थी संख्या- होणारे नुकसान 

  • ५००- ८,४५,००० 
  • १०००- १,६९,०००० 
  • २०००- ३,३८,०००० 
  • ३००० - ५०,७०,०००

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT