Prisoner arrested once again in Nagpur 
नागपूर

चोराच्या हाताला दोर बांधून पोलिस रंगले गप्पांमध्ये; गुंगारा देऊन पसार झाल्यानंतर

अनिल कांबळे

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची झडती सुरू असताना संधी साधून फरार झालेल्या कैद्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. तो गिट्टीखदान परिसरात लपून बसला होता. सायमन ॲन्थोनी फ्रान्सीस (वय १८, रा. ८५ प्लॉट एरिया, दुर्गा माता मंदिराजवळ, अजनी) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमन फ्रान्सीस याला अजनी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या आरोपात २७ ऑगस्टला अटक केली होती. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. पीसीआर संपल्यानंतर अजनी पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते. न्यायालायाने सायमनला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अजनी पोलिसांचे पथक सायमनला घेऊन रविवारी सायंकाळी सहा वाजता मध्यवर्ती कारागृहात गेले होते.

कैद्यांना कारागृहात जमा करीत असताना पोलिसांनी सायमनच्या हाताला दोर बांधला आणि पोलिस बिनधास्तपणे गप्पा करीत उभे होते. पोलिस गप्पांमध्ये गुंतल्याचे पाहून सायमनने पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पळून दोरासह पळून गेला. कैदी पळून गेल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. कैद्याच्या शोधासाठी नागपूर शहर पोलिस दल कामाला लागले होते. शेवटी त्याला गिट्टीखदान परिसरातून अटक करण्यात आली.

घरात बसला होता लपून

सायमन हा कुख्यात चोरटा आहे. त्याच्याविरुद्ध दुचाकी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. कारागृहातून पळ काढल्यानंतर सायमनने गिट्टीखदानमधील आईचे घर गाठले. तो घरात लपून बसला. अजनी पोलिसांनी छापा घातला. त्याच्या घरीतून त्याला अटक केली. आरोपी सापडताच पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त ३० मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT