corona testing e sakal
नागपूर

आता चक्क कार्यालयासमोरच होणार कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आढळल्यास गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. खासगी कार्यालय आणि कंपनींना केवळ मोजका स्टाफ बोलविण्याचे आदेश आहेत. तरीही अनेक खासगी कार्यालयात कर्मचारी मोठ्या संख्येने हजर राहतात. त्यामुळे आता चक्क कार्यालयासमोरच अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास थेट खासगी कार्यालये सील करू मालक आणि मॅनेजरवर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे सुरू केल्यापासून रिकामटेकड्यांची गर्दी कमी झाली आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत किती खासगी कार्यालये आहेत. त्याची यादी तयार करण्यात आली आहे. या कार्यालयांचा जबाबदार अधिकारी (मालक-मॅनेजर) कोण? त्याचे नाव, मोबाइल क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. खासगी कार्यालयात क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी आढळून आल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध साथरोग कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. याशिवाय खासगी कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १० वाजतापर्यंत आहे. कार्यालयातील नियमभंग होत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्ष व संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही अमितेशकुमार यांनी केले.

डॉक्टरांशी गैरवर्तन केल्यास गुन्हे दाखल -

सध्याच्या भयानक स्थितीत डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटलमधील स्टाफ स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णांचा जीव वाचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे. जर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील स्टाफशी गैरवर्तन केल्यास थेट गुन्हे दाखल करून कारागृहात रवानगी करण्यात येईल, असा खणखणीत इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवा तसा अहवाल देण्यासाठी पोलिसांचा दबाव, महिला डॉक्टरचे चार पानी पत्रात खळबळजनक आरोप

Kolhapur Kagal Video : कागलला उरुसात जायंट व्हील पाळण्यात नागरिक अडकले, तब्बल २ तासांचा थरार; पाळणा लॉक झाला अन्

Kolhapur Shocking Incident : वाहन बाजूला घे एवढचं म्हणाला अन् थेट गळ्यावर वार केले, पत्नी मदतीसाठी याचना करत होती पण..., कोल्हापुरातील घटना

Panchang 25 October 2025: आजच्या दिवशी सत्पात्री व्यक्तीस गहूं, तांबडे वस्त्र, गूळ दान करावे

Unseasonal Rain : अवकाळी पुन्हा परतला, अजून किती दिवस पाऊस पाठ सोडणार नाही; कोल्हापुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT