Professor Beloved raped by showing the lure of marriage 
नागपूर

लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापक प्रेयसीवर बलात्कार 

अनिल कांबळे

नागपूर : शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेवर तिच्या विवाहित प्रियकराने बलात्कार केला. तसेच तिच्याकडून बंगला बांधण्यासाठी नऊ लाख रुपये उकळले. याप्रकरणी प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनुज नरेंद्र भुयार (वय 38, रा. गणपतीनगर, अमरावती) असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 36 वर्षीय महिला मनस्वी (बदललेले नाव) ही अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. तिचे लग्न झाले होते. मात्र, कौटुंबिक वादातून तिने पतीकडून घटस्फोट घेतला. घरातील सदस्य तिच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगा शोधत होते. दरम्यान, मनस्वीची 28 जानेवारी 2020 रोजी फेसबुकवरून अनुज भुयार या युवकाशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांशी चॅटिंग केली. 

त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. त्यानंतर दोघेही वॉट्‌स ऍपवरून संपर्कात होते. आरोपी अनुज भुयारने स्वतःला अविवाहित सांगून, श्रीराम बॅंकेत मॅनेजर असल्याचे सांगितले. तसेच शेअर्स मार्केटमध्येही गुंतवणूक करीत असल्याचे सांगितले. दोघांची मैत्री झाली. मनस्वीने त्याला नागपुरात भेटायला बोलावले. बजाजनगरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये त्याने रूम घेतली. सायंकाळी मनस्वी भेटायला आली. 

तिने स्वतःच्या पहिल्या पतीबाबत माहिती दिली आणि घटस्फोट घेतल्याचे सांगितले. अनुजने तिला प्रपोज केले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी मनस्वीने त्याला आपल्या घरी नेऊन कुटुंबीयांशी प्रियकर म्हणून ओळख करून दिली. 
 

प्रा. मनस्वीला लुबाडले

 
आपला राजा-राणीचा संसार असावा...मोठे दुमजली घर असावे... त्यामध्ये मस्तपैकी फर्निचर असावे.. असे स्वप्न अनुजने मनस्वीला दाखवले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने मनस्वीला पैशाची मागणी केली. होणारा पती आणि आपल्यालाच घरात ठेवणार म्हणून तिनेही त्याच्या भूलथापांना बळी पडत तब्बल 9 लाख रुपये दिले. 
 

प्रियकर निघाला विवाहित 


अनुज भुयार तोतया बॅंक अधिकारी असून, तो विवाहित असल्याची माहिती प्रा. मनस्वीला मिळाली. त्याचे 2006 ला लग्न झाले असून, त्याला 9 वर्षांची मुलगी आहे. पत्नीसह तो अमरावतीमध्ये राहतो. तसेच त्याला 2013 मध्ये त्याच्यावर एका युवतीने बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. सुंदर आणि घटस्फोटित महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लुबाडण्याच्या तो सवयीचा असल्याची माहिती समोर आली. 
 

लग्नासाठी टाळाटाळ 


प्राध्यापिका असलेल्या मनस्वीने अनुजची ओळख कुटुंबीयांसह आपल्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना करून दिली. लवकरच विवाहबद्ध होत असल्याचेही सांगितले. मात्र, अनुज नागपुरात केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी येत होता. मोठ्या हॉटेलमध्ये रूम केल्यानंतर मनस्वीचा उपभोग घेतल्यानंतर लग्नासाठी टाळाटाळ करीत होता. त्यामुळे मनस्वीला संशय आला होता. 
संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

Latest Marathi News Updates : माजी खासदार सुजय विखेंचे बॅनर फाडल्याप्रकरणी फिर्यादी निघाला आरोपी

Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावर

Shoumika Mahadik : शौमिका महाडिकांच्या एका वाक्याने भाकरी फिरणार? गोकुळ दूध संघात सभासदांचे गट्टा मतदान असलेल्या आबाजी पुढच्या निवडणुकीत कोणासोबत

SCROLL FOR NEXT