नागपूर

बांधकाम मलब्यातून तयार करणार रेती, विटा; नागपूर महानगरपालिकेचा प्रकल्प

महानगरपालिकेचा भांडेवाडीत प्रकल्प, हैदराबादच्या कंपनीसोबत करार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात दररोज मोठ्या प्रमाणात बांधकामातील कचरा निघतो. याशिवाय अनेकजण नवे घर बांधण्यासाठी जुने पाडतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागते. यावर मनपाने उपाय शोधला आहे. बांधकामातील मलब्यावर प्रक्रिया करून रेती आण विटा तयार करण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादच्या कंपनीसोबत करार केला असून मनपा भांडेवाडी येथे प्रकल्प उभारला जाणार आहे.

शहरात बांधकाम व पाडाव कचरा महापालिकेसाठी डोकेदुखी ठरला होता. बांधकामातील विटा, सिमेंट, रेती घेऊन जाण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागत होता. आतापर्यंत रेती केवळ नदीतूनच येते, एवढेच सर्वांना माहीत होते. महापालिकेने या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी रामकी एन्व्हायरो इंजिनिअर लिमिटेडअंतर्गत कार्यरत ‘हैद्राबाद सीॲण्डडी वेस्ट’ कंपनीसोबत करार केला.

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मनपाचे अधिकारी तसेच कंपनीचे वरिष्ठ सहायक व्यवस्थापक माधवी जी. यांनी करारावर स्वाक्षरी केली. कंपनीला प्रक्रिया युनिट तयार करण्यासाठी मनपातर्फे भांडेवाडी येथे ५ एकर जमीन देण्यात आलेली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुक्रवारी जमिनीची पाहणी सुद्धा केली. यावेळी उपअभियंता राजेश दुफारे, रामकी एन्व्हायरो इंजिनिअर लिमिटेडचे व्यवस्थापक मेहबूब सुभानी शेख, कनिष्ठ अभियंता प्रशांत वाघमारे, सल्लागार मेसर्स आर. जगताप अँण्ड असोसिएटचे यादव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT