shifting state science institute nagpur to pune
shifting state science institute nagpur to pune  sakal
नागपूर

नागपुरातील राज्य विज्ञान संस्था पुण्यात नेण्याचा डाव?

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात विज्ञान विषयाचा प्रचार करणे, विद्यार्थी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य विज्ञान संस्था नागपुरातून पुण्याला पळविण्याचा डाव सुरू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. याचा डावाचा एक भाग म्हणून या संस्थेतील पदे सातत्याने रिक्त ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. राज्य विज्ञान संस्थेची स्थापना १९६८ साली करण्यात आली. १ एप्रिल १९८० साली संस्थेचे कार्यालय नागपुरात हलविण्यात आले. २०१६ साली राज्य विज्ञान संस्थेचे ‘प्रादेशिक विद्या प्राधिकरण’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर या संस्थेला घरघर लागली आहे.

संस्थेचे संचालक पद प्रभारी असून त्यातील अनेक महत्‍त्वाची पदे रिक्त आहे. त्यात ४४ मंजूर पदापैकी केवळ १५ पदे भरलेली असून २९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरली नाहीत. त्यामुळे पुण्यात असलेल्या विद्या प्राधीकरणाच्या मुख्यालयातच हे कार्यालय नेण्याचा डाव शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे सातत्याने रिक्त पदे ठेवण्यात येत असल्याचे समजते.

विज्ञान संस्थेचे बहुपयोगी उपक्रम

शेती व अन्नधान्य, आरोग्य, पोषण व वैद्यकव्यवसाय, उद्योगधंदे व औद्योगिक विकास, निवास व सार्वजनिक वास्तू-बांधकाम, नैसर्गिक साधनसंपत्ती, वाहतूक, माहिती व जनसंज्ञापन, शिक्षण, मनोरंजन आदी सर्व क्षेत्रांत मानवी जीवनाचे कल्याण साधण्याची प्रभावी साधने म्हणून विज्ञान व तंत्रविद्या या विषयाचे असाधारण महत्त्व आहे. या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी आणि त्याचा प्रचार व प्रसार गाव आणि तालुका पातळीवर करण्यासाठी राज्य विज्ञान संस्थेद्वारे विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, इन्प्सायर अवार्ड, अपूर्व विज्ञान मेळावा, विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण, विज्ञान छंद, विज्ञानाबाबत माहिती देणे, नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेचे अर्ज भरणे, त्यासाठी मेळावे घेणे आदी अनेक कार्यक्रम व उपक्रमाचा समावेश आहे.

मंजूर पदे आणि रिक्त पदे

संचालक - १ - रिक्त

प्राध्यापक - ४ - २

अधिव्याख्याता - ८ - ४

अधीक्षक - १- ०

शास्त्र सल्लागार - १- १

तंत्रसहाय्यक - २ - २

विज्ञान पर्यवेक्षक- ६ - ५

वरिष्ठ लिपिक - २ - १

लघुलेखक - १ - १

लघुटंकलेखक - २ - २

मुख्य लिपिक - १ - ०

वरिष्ठ लिपिक - २ - १

कनिष्ठ लिपिक - २ - ०

प्रयोगशाळा सहाय्यक - ३ - ३

वाहनचालक - २ - २ (वाहन नाहीच)

नाईक - १ - १

शिपाई - ५ - २

फर्रास - १ - १

सफाईकामगार १ - १

विदर्भावर अन्याय होणार

शिक्षण विभागातील सर्व प्रमुख कार्यालये ही पुण्यात आहे. मात्र, राज्यस्तरावर असलेल्या प्रादेशिक विद्या प्राधीकरणाचे (राज्य विज्ञान संस्था) एकमेव कार्यालय हे राज्याच्या उपराजधानीत आहे. आता तेही पुण्यात हलविल्यास विदर्भावर पुन्हा अन्याय होणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाकडून जाणून बुजून अशाप्रकारे पदे रिक्त ठेवून ते कार्यालय पुण्यात हलविणे वा बंद करण्याचा मानस आहे. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे याला आमदार म्हणून विरोध करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देणार आहे.

-नागोराव गाणार, शिक्षक आमदार, विधानपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT