Sex racket.jpg Sex racket.jpg
नागपूर

उपराजधानी होतेय ‘सेक्स रॅकेट’चे केंद्र; ‘कॉन्ट्रॅक्ट’वर मुली शहरात

अनिल कांबळे

नागपूर : राज्यातील ‘सेक्स रॅकेट’चे केंद्र म्हणून उपराजधानीची ओळख निर्माण झाली आहे. देश-विदेशातून तरुणी देहव्यापाराच्या ‘कॉन्ट्रॅक्ट’वर शहरात येत असतात. देहव्यापाराच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होते. गुन्हे शाखेने २० महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी ‘सेक्स रॅकेट’वर छापे घालून ७८ तरुणींची सुटका केली आहे. त्यात १२ ते १६ वयोगटातील १० मुलींची समावेश आहे.

उपराजधानीतील सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांचे देश-विदेशातील तरुणींशी संपर्क आहे. मागणी असेल त्या देशातील तरुणींला उपराजधानीत देहव्यापारासाठी करारबद्ध केले आहे. अनेक दलालांचे बॉलिवूड कनेक्शन असून चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती, स्टेज डान्सर आणि रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्सलाही आंबटशौकींनाच्या मागणीवरून नागपुरात बोलावले जाते.

मोठमोठ्या मॉडेल्स विमानाने प्रवास करून तारांकित हॉटेल्समध्ये थांबतात. त्यानंतर लाखोंचे शुल्क आकारून फार्महाऊस, क्लायंट पार्टी किंवा हॉटेलमधील पॉश रूममध्ये उपलब्ध होतात. रात्रभरात लाखोंमध्ये उधळण करणाऱ्यांमध्ये मोठमोठे व्यापारी, बिल्डर्स, राजकीय वरदहस्त असलेले पांढरपेशे आणि अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश आहेत. दलालांचे नेटवर्क पाहता काही भोजपुरी आणि टॉलीवूडमधील काही तारका आणि मॉडेल्सही उपराजधानीत ‘नाईट स्टे’च्या नावाने देहव्यापारासाठी येत असल्याची माहिती आहे.

विदेशी तरुणींची ‘डिमांड’

रशिया, सिंगापूर, कझाकिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, दुबई, उझबेकिस्तान आणि श्रीलंका या देशातील काही तरुणी नागपुरातील दलालांच्या संपर्कात आहेत. विदेशातील तरुणींशी लाखोंचा करार करून उपराजधानीत बोलावले जातात. विदेशातील तरुणींची मागणी उपराजधानीत असून यापूर्वी गुन्हे शाखेने छापे घालून विदेशी तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले आहे.

ब्यूटी पार्लर ते मसाज सेंटर

शहरातील अनेक ब्यूटी पार्लरमध्ये सेक्स रॅकेट चालतात. मसाज पार्लर, लेडिज जीम, युनिसेक्स सलून, पंचकर्म असे अनेक गोंडस नावाने देहव्यापार सुरू असतो. गुन्हे शाखेने अनेक ब्यूटीपार्लरमध्ये छापे घालून देहव्यापार उघडकीस आणला आहे. अनेक सेक्स रॅकेटमध्ये १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींची सुटका केली आहे.

गणेशपेठ-बेलतरोडी ‘हॉट’

देहव्यापारासाठी बेलतरोडी आणि गणेशपेठ पोलिस स्टेशनचा परिसर ‘हॉट’ आहे. गणेशपेठमध्ये सर्वाधिक सेक्स रॅकेट असून काही पोलिसांच्या मदतीनेच हा व्यवसाय चालत असल्याचे बोलले जाते. सीताबर्डी, अजनी, नंदनवन, लकडगंज, मनीषनगर, धरमपेठ आणि अंबाझरी या परिसरात देहव्यापाराचा बोलबाला आहे.

वर्ष गुन्हे दलाल पुरुष महिला पीडित तरुणी

२०२० - १४ २७ ३४ ४५

२०२१ - १९ १८ १६ ३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT