passport photo 
नागपूर

कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूने केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सविस्तर वाचा

नरेंद्र चोरे


नागपूर : माझे वडील उत्तम क्रिकेट खेळायचे. भारतीय संघाकडून खेळण्याचे त्यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने ते वरच्या स्तरापर्यंत पोहोचू शकले नाही. मी देशाचे प्रतिनिधित्व करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. टीम इंडियाकडून खेळणे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी व्यक्‍त केले. नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि कोशिश फाउंडेशनच्या संयुक्‍त विद्यमाने "कॉनफॅब विथ ऍचिव्हर्स' सिरीजअंतर्गत आयोजित वेबिनारमध्ये चाहत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 


कांबळी म्हणाले, क्रिकेट माझ्या रक्‍तातच होते. उमेदीच्या काळात माझे वडील क्रिकेट खेळायचे. त्यांना क्रिकेट खेळताना पाहूनच मी या खेळाकडे आकर्षित झालो. 1991 मध्ये देशाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळणे, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण होता. आयुष्यातील ती पहिली मॅच कदापि विसरू शकत नाही. त्यानंतर वर्ल्डकपमध्येही खेळण्याची संधी मिळाली. 
सचिन तेंडुलकरसोबतच्या मैत्रीबद्‌दल कांबळी म्हणाले, आम्ही लहानपणापासूनच सोबत क्रिकेट खेळलो. शालेय, रणजी व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनेक वर्षे एकमेकांसोबत नियमित क्रिकेट खेळलो. 1987 मधील वर्ल्डकपमध्ये सोबतच बॉल बॉईजही होतो. क्रिकेटमुळे आमच्यात चांगले "बॉंडिंग' निर्माण होऊ शकले. मात्र आम्हाला खरी ओळख आणि प्रसिद्‌धी हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील विश्‍वविक्रमी भागीदारीने दिली. सेंट झेव्हियर्सविरुद्‌ध शारदाश्रम विद्‌यामंदिरकडून केलेल्या 664 धावांच्या भागीदारीने आम्हाला देशभरातच नव्हे, संपूर्ण जगात प्रसिद्‌धी मिळवून दिली.


हेही वाचा : विदर्भाच्या या युवा क्रिकेटपटूला घालायचीय इंडिया कॅप
 

 

त्या ऐतिहासिक कामगिरीबद्‌दल कांबळी म्हणाला, आम्ही दोघांनीही त्रिशतके झळकाविली असली तरी, आम्हाला त्या दिवशी प्रत्येकी पाचशे धावा आणि हजार धावांची भागीदारी करायची इच्छा होती. दुर्दैवाने "लंच ब्रेक' झाल्यामुळे आमचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्या दिवशी आमच्याकडून विश्‍वविक्रमाची नोंद झाली, याची आम्हाला कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या झळकल्यानंतरच विक्रमाबद्‌दल कळले. तेव्हापासून आमचे "फॅन फॉलोअर्स'ही मोठ्या प्रमाणावर वाढले. 


आचरेकर सरांबद्‌दल ते म्हणाले, कितीही धावा काढल्या तरीही ते कधीच समाधानी नसायचे. शंभर धावा काढल्या तरीदेखील "केवळ शंभरच काढल्या' अशीच त्यांची प्रतिक्रिया असत. त्यांनी आमच्यात मोठ्या धावांबद्‌दलची भूक निर्माण केली. त्यांच्या या गुरूमंत्रामुळेच आम्ही आयुष्यात मोठ्या खेळी करू शकलो. लॉकडाउनबद्‌दल ते म्हणाले, हा काळ खेळाडूंसह सर्वांसाठीच कठिण आहे. एरवी कामाच्या व्यापामुळे परिवाराला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. या कालावधीत घरीच राहून मुले व परिवारांसोबत वेळ घालविला. आतापर्यंत जे "मिस' केलं, त्याची काही प्रमाणात भरपाई करू शकलो. 


मैदानावरच्या सरावाला ऑप्शनच नाही, घरात राहून होतंय "बोअर'!
 

खेळाडू व पालकांना मोलाचा सल्ला 


कांबळी यांनी यावेळी खेळाडू व त्यांच्या पालकांनाही सल्ला दिला. ते म्हणाले, पालकांनी कधीच आपल्या मुलांवर अपेक्षा लादू नये. त्यांच्या आवडीनिवडीनुसारच करिअर करू द्यावे. केवळ त्यांच्या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा, आशिर्वाद द्या. खेळाडूंनाही "शॉर्टकट' न वापरण्याचा सल्ला दिला. शिक्षण असो किंवा खेळ. फोकस ठेवून प्रामाणिक मेहनत केल्यास हमखास यश मिळते, असे सांगून स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT