The question of farmers How to sell grain at a single center
The question of farmers How to sell grain at a single center 
नागपूर

एकमेव केंद्रावर धान विकायचा तरी कसा; शेतकऱ्यांचा सवाल

रूपेश खंडारे

पारशिवनी (जि. नागपूर) : तालुक्यात एकच धान खरेदी केंद्र सुरू आहे. रामटेक खरेदी-विक्री केंद्रामार्फत धान खरेदी केली जाते. एकच धान खरेदी केंद्र असल्याने पारशिवनी तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

रामटेक तालुक्यात तीन केंद्र सुरू आहेत. मौदा येथे चार केंद्रांवर धान खरेदी सुरू असताना पारशिवनीत एकच खरेदी केंद्र सुरू आहे. गरजू धान उत्पादकांनी धान विकावा तरी कुठे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. एकीकडे हजारो शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली असून, एकच खरेदी केंद्र असल्याने शेतकऱ्यांचे धान वेळेवर खरेदी केले जात नाही. त्यामुळे वाट पाहणे किंवा खाजगी व्यापाऱ्यांना धान विकणे याशिवाय पर्याय नाही.

तीन शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे असताना शेतकऱ्यांशी दुजाभाव केला जात आहे. पारशिवनी तालुक्यात दोन-तीन धान खरेदी केंद्र सुरू केले तर धान उत्पादकांना धान विकण्यास सोयीचे झाले असते. परंतु, एकच धान खरेदी केंद्र असल्याने एक हजार धान उत्पादकांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली. धान विक्री केंद्रावर दररोज २०-३० धान उतपादकांचे धान खरेदी केले जाते. त्यामुळे गरजवंतांना तात्काळत राहवे लागते. नाइलाजाने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकून गरज भागवत आहेत.

मौदा, रामटेक, काटोल, उमरेड, कामठी व इतर तालुक्यात एकपेक्षा अधिक धान खरेदी केंद्र आहेत. डुमरी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश असताना तेही धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पारशिवनी तालुक्यात कन्हान, डुमरी, पारशिवनी येथे तत्काळ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

तीन धान विक्री केंद्र सुरू करणे गरजेचे
दुजाभाव करून शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. गरजवंत धान उत्पादकांचे धान वेळेवर खरेदी केले जात नसेल तसेच प्रतीक्षा यादी लांबलचक असून, एकच केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नाइलाजाने शेतकरी कमी भावात खाजगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. तालुक्यात तीन धान विक्री केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. 
- सागर सायरे,
शेतकरी, पारशिवनी

डुमरीत लवकरच खरेदी केंद्र

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे लवकरच पारशिवनी डुमरी येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच गोडाउनची पाहणी करण्यात येत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT