exam 
नागपूर

परीक्षा एका दिवसावर, केंद्रावर पोहोचल्याच नाहीत प्रश्‍नपत्रिका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.18) बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यासाठी बोर्डाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, केंद्रावर पेपरची ने-आण करणाऱ्या बऱ्याच सहाय्यक केंद्र संचालकांचा "कस्टोडियन'कडून संपर्क होत नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दुर्गम भागात असलेल्या केंद्रावर पेपर पोहोचवायचे कसे? असा प्रश्‍न बोर्डासमोर निर्माण झाला आहे.

बोर्डाद्वारे मंगळवारी (ता.18) बारावीचा पेपर असल्याने जिल्हास्तरावर परीक्षा केंद्रावर लागणारे सर्व साहित्य पोहोचविण्यात आले. या साहित्याचे प्रत्येक केंद्रावर वाटप करण्याची जबाबदारी संबंधित "कस्टोडियन'वर असते. यासाठी दोन वर्षांपूर्वी बोर्डाद्वारे सर्वच सहाय्यक केंद्र संचालकांना पंधरा दिवसांपूर्वी पत्र पाठवून संपर्क केला जात होता. त्यानंतर बोर्डात बैठक घेऊन त्यांना कामासंदर्भात निर्देश देण्यात यायचे. मात्र, दोन वर्षांपासून त्याची जबाबदारी "कस्टोडियन'कडे देण्यात आली. यामुळे कस्टोडियनला सहाय्यक केंद्र संचालकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत साहित्य नेण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. प्रत्येक कस्टोडियनच्या हाताखाली 6 ते 7 केंद्रांची जबाबदारी आहे. मात्र, बऱ्याच सहाय्यक केंद्र संचालकांशी अद्याप संपर्क झाला नसल्याचे समजते. बारावीसाठी 475 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक 130 केंद्र नागपूर शहर आणि जिल्ह्यात तर चंद्रपूर 81, गोंदिया 74, भंडारा 62, वर्धा 50 तर गडचिरोलीत 48 केंद्रे आहेत. यापैकी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील बरीच केंद्रे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे एक दिवस परीक्षेला असताना, सहाय्यक केंद्र संचालकांना संपर्क होत नसल्यास बारावीचे पेपर केंद्रावर वेळेत कसे पोहोचणार याबद्दल साशंकता आहे. बोर्डाचे अधिकारी याला नकार देत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रश्‍नपत्रिका वेळेत पोहोचतील
सहाय्यक केंद्र संचालकांशी संपर्क झाला आहे. ज्या ठिकाणी झाला नाही, त्या ठिकाणी बोर्डाचेच कर्मचारी प्रश्‍नपत्रिका पोहोचविण्याचे काम करणार आहेत. त्यामुळे पेपर वेळेत केंद्रावर पोहोचतील.
रविकांत देशपांडे, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष, नागपूर विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT