The quiet streets became a little crowded in Nagpur 
नागपूर

हळूहळू धावू लागली उपराजधानी 

मिलिंद लोहे

नागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले नागपूर शहर हळूहळू का होईना पण धावायला सुरुवात झाली. शांत असलेले रस्ते थोडे गजबजू लागलेत. वर्दळ जाणवू लागली. गाड्या धूळखात बंद होत्या त्यावर कापड फिरवून दुचाकी हलवत इंधन आहे की नाही याची शहनिशा करत उभे असलेली वाहने बाहेर काढली जात आहेत. शहर काही प्रमाणात का होईना पळायला लागल्याने उकाडाही वाढला आहे. 

ऐरवी जेवण झाल्यानंतर फेरफटका मारताना "धारा' कारवाईची भीती रहायची. पण आता वाहने धावू लागल्याने "धारा' लागताहेत पण उकाड्यामुळे. दिवसासोबत रात्रीच्या किर्र अंधारात धावणाऱ्या चारचाकी वाहनांचीही वर्दळ दोन दिवसांपासून जाणवू लागली. अनेक दिवसांपासून श्‍वानांची चारचाकी वाहनांमागची "दौड' बंद असल्याने त्यांनीसुद्धा सराव करण्यास सुरुवात केल्याचे रात्रीच्या वेळेस दिसून येत आहे. 

संचारबंदीत काहीच "ठिकाणा' नसल्याने ठिकाण गाठायला कमी अवधी लागायचा. पण "मुसाफिर' वाढल्याने कचकरून, हळुवार ब्रेक मारण्याचे प्रमाणही काहीसे वाढले. सर्वच घरात असल्याने एकमेकांसमोर जाण्याची "शर्यत' मागील काही दिवसांत तितकीशी दिसली नाही. पण, तीसुद्धा गरजेचा भाग असल्याने थोड्या प्रमाणात का होईना भासू लागली. कोरोनामुळे काहींनी अर्ध्यातच "प्रवास' संपविला. त्यांच्या जाण्याने जो आघात कुटुंबांना सहन करावा लागत आहे. ती हानी कधीही भरून निघणार नसली तरी त्यांच्याच प्रिय जीवलगांकरिता धावणेही तितकेच गरजेचे आहे. 

गर्दीत शोध 

एक दिवसाआड बरीच प्रतिष्ठाने उघडण्यात येत आहे. नियमित होण्याकरिता काही अवधी लागेल. काही भागात नीरव शांतता तर काही ठिकाणी गर्दीही होत आहे. कदाचित या दोन्ही ठिकाणी भिरभिरणा-या नजरेने सोडून गेलेल्या आप्तांचा शोध सुरू असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT