Rabies  Sakal
नागपूर

Rabies Disease : रेबीजमुळे ९ महिन्यात १० मुल दगावले,कुत्राच नव्हे घोडा, गाय, म्हैस, लांडग्याचा चावा धोकादायक

Rabies Disease : नागपूर मेडिकलमध्ये ९ महिन्यांत रेबीजमुळे १० मृत्यू झाले आहेत, त्यापैकी अधिकतर १५ वर्षांखालील मुलांचे आहेत. कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या चाव्यामुळेही रेबीजचा धोका असतो. लसीकरण आणि जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपायांची गरज व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रचलित आजारांपैकी एक म्हणजे रेबीज. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर कुत्र्याच्या लाळेद्वारे हा आजार मानवी रक्तवाहिन्यातून संक्रमित होतो आणि रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूत शिरतो, असा समज समाजात आहे, परंतु मांजर चावल्यामुळे रेबीज होऊन मृत्युमुखी पड़णाऱ्यांची संख्या अधिक आहे.

कुत्रा आणि मांजरच नव्हे तर गाय, म्हैस, घोडा, लांडगा, कोल्हा, वटवाघुळ, माकड, मुंगुस या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे रेबीज होण्याचा धोका असतो. रेबीजमुळे सर्वाधिक मृत्यू १५ वर्षांखालील मुलांचे असतात. तर मेडिकलमध्ये ९ महिन्यांत रेबीजमुळे १० जण दगावले आहेत.

लस न टोचलेली कुत्री मुलांना चावल्याने हा रोग अधिक वेगाने बळावत आहे. यावर प्रतिबंधक लस टोचून घेणे, हाच एकमेव इलाज आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेत रेबीजचे विषाणू मिसळतात. मात्र पाळीव कुत्र्यांयांबाबतही मालकांनी काळजी बाळगणे आवश्यक आहे.

पाळीव कुत्र्यांना ३ महिने झाल्यानंतर पहिला डोस द्यावा. यानंतर दर ६ महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्यावी. पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्‍या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

क्‍लासिकल रेबीजची लक्षणे

  • जखम खाजवणे

  • पाण्याची भीती वाटणे

  • गळ्याचे आणि श्‍वासनलिकेचे स्नायू आकुंचन पावतात

  • विविध भासही होतात.

आजाराची लक्षणे काय ?

  • ताप येणे

  • मानसिक त्रास,

  • निद्रानाश

  • भास होणे

  • पाण्याची भीती वाटणे

  • माणसाचा घसा खरवडून निघणे

कुत्रा व इतर जनावर चावल्यास हे करा

  • चावा घेतलेली जागा साबणाने वारंवार घासून धुवून घ्यावी

  • ती पुसून स्वच्छ करावी

  • टिंक्‍चर आयोडिन किंवा डेटॉल लावावे

  • डॉक्टरकडे जाऊन लसीकरण करून घ्यावे

  • पॅरॉसिटिक

रेबीजची लक्षणे

  • रुग्णाला पाण्याची भीती वाटत नाही

  • ताप

  • डोकेदुखी

  • पायांमध्ये अशक्‍तपणा

  • पक्षघात

  • हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता

ॲन्टी रेबीज लस रेबीजवर प्रभावी आहे. लसीकरणातून रेबीजवर बऱ्यापैकी नियंत्रण आणता येते. सामाजिक तसेच स्वंयसेवी संस्थांच्या पुढाकाराने जनजागरण करण्यासोबतच लसीकरणाची मोहीम राबवण्याची गरज आहे. भोंदूबाबापासून रुग्णांना दूर ठेवावे. पोलिओ लसीकरणाच्या धर्तीवर रेबीज प्रतिबंधक लस टोचण्याने रेबीज संपूर्णतः नियंत्रणात येईल.

-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर.

रेबीजची लक्षणे दिसण्यासाठी ३ दिवस ते ४०० दिवसांपेक्षाही अधिक अवधी लागू शकतो. याला ‘इनक्‍युबेशन पिरियड’ म्हणतात. रेबीजचा प्रसार कुत्र्याबरोबरच मांजर, जंगली पशूंच्या लाळेमार्फत होतो. कोणत्याही कुत्र्याने किंवा मांजराने चावले असता किंवा ओरबाडले असता प्राण्यांच्या चाव्यामुळे जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते.

-डॉ. समीर गोलावार,सहयोगी प्राध्यापक, मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS 100th Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना, नेहरुंच्या कृपेने वाचली; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

Manoj Jarange: दसरा मेळाव्याआधी राधाकृष्ण विखे पाटलांनी फोन का केला? संपूर्ण किस्सा सांगत मनोज जरांगेंनी समाजावर नवे काम सोपवले

Shubman Gill: दिसतो तसा नाही! अभिषेक शर्माने केली मित्राची पोलखोल; म्हणाला, 'त्याच्यामुळे आम्ही निलंबित झालो होतो...'

Video : डॉक्टरांचा निर्दयीपणा! हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायला नकार; विव्हळत फरशीवरच दिला बाळाला जन्म, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

SCROLL FOR NEXT