sri gajanan shegavi natak in london sakal
नागपूर

Shree Gajanan Shegavi Drama : लंडनमध्ये ‘श्री गजानन शेगावीचे’ हाऊसफुल्ल

या नाट्यामुळे लंडनच्या महाराष्ट्र मंडळ येथे हाऊसफुल्लची पाटी लागलेली पाहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur : राधिका क्रिएशन आणि रंजन कला मंदिराच्या सहकार्याने नुकताच लंडन येथे ‘श्री गजानन शेगावीचे’ नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाट्यामुळे लंडनच्या महाराष्ट्र मंडळ येथे हाऊसफुल्लची पाटी लागलेली पाहायला मिळाली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमा अंतर्गत नाटक, श्री गजानन महाराज पोथीचे पारायण, नामजप कीर्तन, महाराजांची दिंडी पालखी, महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाटकाच्या निमित्ताने राधिका क्रिएशनचे कलाकार पहिल्यांदाच लंडन येथे गेले होते. अतिशय उत्साहाचे वातावरण, परदेशात प्रयोग करण्याचा एक वेगळा अनुभव कलाकारांना मिळाला होता.

‘श्री गजानन शेगावीचे’ हे नाटक भक्त मंडळींना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. नाटकाचे लेखन डॉ. रवी गीऱ्हे यांनी, दिग्दर्शन सारिका पेंडसे, सूत्रधार संजय पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे तर संगीताची बाजू संजीव खटी यांनी सांभाळली. नाटकात सुधाची मध्यवर्ती भूमिका डॉ. भाग्यश्री चिटणवीस यांनी अतिशय ताकदीने उभी केली.

सुधीरची भूमिका बालरंजनच्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या अथर्व जोशी याने केली. इतर भूमिकेत सारिका पेंडसे, डॉ. स्वप्नगंधा खटी, संजीव खटी, रवींद्र संगवई, संजय पेंडसे, डॉ. सुषमा पनकुले आणि श्री महाराजांच्या भूमिकेत लंडन मधील आराध्य सकपाळ यांनी काम केले.

लंडन येथील गजानन महाराज यूके परिवार ट्रस्टचे कार्यकर्ते परेश देशमुख, चेतन हरपाळे, भक्ती कदम आणि रंगमंच लंडनची रेश्मा देशपांडे यांनी सहकार्य केले. कलाकारांनी देखील दिंडी, लेझिम, पारायण यात भाग घेतला आणि आपला सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT