Central railway police sakal media
नागपूर

RPF: ‘मिशन जीवन रक्षक’ने वाचविला ४४ लोकांचा जीव! मध्य रेल्वेच्या आरपीएफची मोहीम, इतक्या कोटींचा मुद्देमाल मिळवला परत

धावत्या रेल्वेतून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४४ प्रवाशांचा जीव रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात वाचवला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Mission Jivan Rakshak: धावत्या रेल्वेतून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४४ प्रवाशांचा जीव रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात वाचवला. मध्य आरपीएफ ‘मिशन जीवन रक्षक’ मोहीम राबवित असून यांतर्गत सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कामगिरी बजावली.

रेल्वे पकडण्याच्या नादात अनेक प्रवासी धावत्या गाडीत चढतात. प्रसंगी अनेकदा तोल जाऊन गाडी व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून काही लोकांचा जीव गेला. तर धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादातही अशाच घटना घडतात. यामुळे प्लॅटफॉर्मवर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ‘मिशन जीवन रक्षक’ विशेष मोहीम राबविली.

स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांवर नजर ठेवली. धावत्या गाडीत चढणारे व उतरणारे प्रवासी खाली पडताना दिसताच आरपीएफचे जवान त्यांना वाचविण्यासाठी झेपावतात.

मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर व पुणे विभागातील ४४ जणांना वाचविण्यात आरपीएफला यश आले. यामध्ये मुंबई विभागात २१, भुसावळ विभागात १५, नागपूर विभागात २, सोलापूर विभागात २ आणि पुणे विभागातील ४ जणांचा सहभाग आहे. तसेच आरपीएफने घरून रेल्वेने पळून जाणाऱ्या मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. गाडी पकडण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन आरपीएफने केले आहे. (Latest Marathi News)

चोरीचे ३७२ गुन्हे दाखल

चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी आरपीएफने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ ही मोहीम राबविली. गेल्या आठ महिन्यांत ३७२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात १ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत मिळविला. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, मौल्यवान वस्तू, दागिने आदींचा समावेश आहे. मुंबई विभागात सर्वाधिक १६९ चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले. सोलापूर ३३, भुसावळ ७७, नागपूर ५६ आणि पुणे विभागात ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT