rain sakal
नागपूर

नागपुरात ऊन-पावसाचा लपंडाव; सकाळी जलधारा, दुपारी लख्ख ऊन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सकाळी पावसाने केलेली जोरदार बॅटिंग व काळ्या ढगांनी दाटलेल्या आकाशामुळे मंगळवारी दिवसभर पाऊस पडतो की काय, असे वाटत असतानाच दुपारी लख्ख ऊन पडले. परंतु, सकाळी कोसळलेल्या जलधारांनी निर्माण केलेल्या गारव्यामुळे दुपारी घामाच्या धारांनी उसंत घेतली. सायंकाळी काही भागात सरी कोसळल्या. एकूणच शहरवासींनी आजही ऊन पावसाचा लपंडाव अनुभवला.

पोळ्याच्या पाडव्याची सकाळ जोरदार पावसाने सुरू झाली. शहरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मारबत, बडग्याची मिरवणूकही विलंबानेच निघाली. मेघगर्जनेसह पावसामुळे अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’लाही दडी मारली. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते, चौक जलमय दिसून आले. सकाळी आठ वाजपासून सुरू झालेल्या पावसाने दोन तास शहर चिंब केले. त्यामुळे पोळ्यानिमित्त दारावर ठेवलेले मेढे जाळण्याचीही अनेकांची पंचाईत झाली.

पोळ्याचा पाडवा त्यात पावसामुळे अनेकांनी ऐनवेळेवर कार्यालयात जाण्याचा बेत रद्द केला. शहरातील मेडिकल चौक, मानेवाडा रोड, पडोळ हॉस्पिटल परिसरातील रस्ता, अशोक चौक, आशीर्वाद टॉकिज चौकासह अनेक रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्यांना पावसाच्या पाण्यातून मार्ग काढावा लागला.

सकाळी ढगांमुळे काळे कुट्ट झालेले आकाश दुपारपर्यंत स्वच्छ झाले अन् लख्ख ऊन पडले. परंतु, सकाळी पावसामुळे वातावरण थंड झाल्याने दररोजच्या तुलनेत उन्हाचे चटक्याची तीव्रता कमी होती. सकाळी शहरातील तुडुंब भरलेले नाले, दुपारपर्यंत नेहमीच्या संथगतीने वाहताना दिसून आले. सायंकाळी शहराच्या काही भागात सरी कोसळल्या. एकूणच दिवसभर ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ नागपूरकरांनी अनुभवला.

तान्हा पोळ्याची वेळ बदलली

कोरोनामुळे तान्हा पोळ्यावर निर्बंध असले तरी अनेक भागात सकाळी चिमुकल्यांना बोलावण्यात आले होते. परंतु, पावसामुळे आयोजकांना तान्हा पोळ्याची वेळ बदलावी लागली. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने अनेक भागातील चिमुकल्यांनी तान्हा पोळा उत्साहात साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT