Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University sakal
नागपूर

Nagpur : सहा उमेदवार उभे करण्याचे डोके कुणाचे?

सिनेट निवडणूक : मविआचे नऊ उमेदवार पराभूत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. २३ ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीचे ११ पैकी १० उमेदवार पराभूत झाले. खुल्या प्रवर्गात पाच जागा असताना सहा उमेदवार उभे करण्याचे डोके कुणाचे असा सवाल आता पराभूत उमेदवार उपस्थित करीत आहेत.

नागपूर विभागीय पदवीधर, नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला रोखण्यासाठी एकजुटीने निवडणूक लढली होती. त्यामुळे ॲड. अभिजित वंजारी आणि सुधाकर अडबाले आमदार होऊन विधान परिषदेत दाखल झाले. त्या तुलनेत अतिशय छोट्‍या असलेल्या निवडणुकीत या नेत्यांना आघाडीची किमया साधता आली नाही यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अभिजित वंजारी आणि बबनराव तायवाडे आघाडीचे नेते आहेत. त्यांनीच सर्व नियोजन केले होते. दोघांनीही यापूर्वी अनेकदा विद्यापीठाच्या निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे कुठे घात होतो आणि विभाजन कसे होते याचा त्यांना अंदाज नव्हता यावर कोणाचा विश्वास नाही. तायवाडे सरांनी अनेक वर्षे अकाऊंटचे क्लासेस घेतले. असे असतानाही त्यांची आकडेमोड कशी काय चुकली, हे समजायला मार्ग नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सर्वाधिक महाविद्यालये विदर्भात आहेत. यावेळी ठाकरे यांची शिवसेनासुद्धा सोबत होती. सेनेने सुमारे १० हजार सदस्य नोंदणी केली होती. त्या भरोशावर किमान ५० टक्के जागा महाविकास आघाडीला सहज जिंकता आल्या असत्या. मात्र मनमोहन बाजेपेयी यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला विजयी पताका फडकवित आली नाही.

बाजपेयी यांना आघाडीच्या नेत्यांसोबत असलेल्या मैत्रीचा थोडाफार फायदा झाला. ‘मेडिकल’ चौकातील कनेक्शन त्यांच्या पथ्यावर पडले. ते थोडक्यात बचावले, अन्यथा त्यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढावली असती. ठाकरे सेनेने पॅनेल व्होटिंग केले नसते तर बाजपेयी यांचा पराभव निश्चित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT