रमजान आणि गुढीपाडव्या निमित्ताने हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. पुढील आठवड्यातही भाव वाढ होण्याची शक्यता आहे. साठेबाज आणि उन्हाळी वाळवण करण्यासाठी मागणी वाढल्याने मूग मोगर, वटाणा डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहे. 
नागपूर

ऐन गुढीपाडवा आणि रमजानच्या वेळी वाढले डाळींचे भाव; सर्वसामान्यांना फटका; जाणून घ्या किंमत

राजेश रामपूरकर

नागपूर : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र टाळेबंदी लावण्यात आल्याने बाजारात सर्वच डाळींसह धान्यांची आवक प्रभावित झाली. डॉलरच्या दरात झालेली वाढ, साठेबाजांची वाढलेली खरेदी आणि आवक घटल्याने प्रति क्विटंल तूर आणि हरभरा डाळीच्या दरात ३५० ते ४०० रुपयाची वाढ झाली. 

रमजान आणि गुढीपाडव्या निमित्ताने हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. पुढील आठवड्यातही भाव वाढ होण्याची शक्यता आहे. साठेबाज आणि उन्हाळी वाळवण करण्यासाठी मागणी वाढल्याने मूग मोगर, वटाणा डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे टाळेबंदी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारात तुरीची आवकही कमी झालेली असताना साठेबाजांकडून खरेदीचा वेग वाढलेला आहे. तसेच डॉलरच्या दरातही वाढ झाल्याने तूर डाळीच्या दर वधारू लागले आहे. हरभऱ्याचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवकही कमी झालेली आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत बाजारातही मागणी वाढलेली आहे. त्यामुळेच भाव वाढू लागलेले आहेत. गुढीपाडवा आणि रमजानच्या निमित्ताने मागणी वाढलेली दिसत आहे. मुगमोगर, उडीद, मटकी, मसूर डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहे, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

सणासुदीच्या निमित्ताने चांगल्या गव्हाची मागणी वाढली आहे. अद्यापही हवी तशी आवक सुरू झालेली नसल्याने भावात किंचित वाढ झालेली आहे. उन्हाळा अधिक कडक होऊ लागल्याने बाजारातील मागणी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखर कोटा अधिक आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार कोटा पूर्णपणे संपू शकतो. त्यामुळे साखरेच्या दरात प्रति क्विंटल ३० ते ४० रुपयाची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गेल्यावर्षी, एप्रिल २०२० मध्ये १८ लाख टनाचा कोटा देण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने साखरेच्या वितरणातील नियोजनासाठी आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा मंजुरीची प्रक्रिया लागू केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT