Reasons behind get thirsty at night time  
नागपूर

तुम्हालाही भरपूर तहान लागते? सतत घसा कोरडा पडतो? मग जरा थांबा..आधी हे वाचा  

अथर्व महांकाळ

नागपूर : पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपले शरीर कामच करू शकत नाही. म्हणूनच भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे म्हणतात. मात्र काही जणांना दिवसभर सतत तहान लागते. अगदी त्याचा घसा कोरडा पडतो. तसेच कितीही पाणी पिले तरी तहान भागत नाही. अनेक जण या गोष्टींना नॉर्मल समजतात. मात्र या गोष्टी सामान्य नाहीत. यामागे काही करणे दडलेली आहेत. याच बदल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यास आपल्याला तहान लागते. थंडीत जास्ती तहान लागत नाही. मात्र उन्हाळ्यात कितीही पाणी पिले तरी तहान काही भागत नाही. पण आपण जितके पाणी सकाळी पितो तेवढे तरी रात्री कधीच पित नाही. मात्र काही लोकांना अचानक रात्री भरपूर तहान लागते त्यांचा घसा कोरडा पडतो. 

रात्री तहान लागण्याची कारणे -

रात्री तोंड उघडे ठेऊन झोपायची सवय 

काही जण झोपेत खूप घोरतात किंवा नाक बंद झाल्याने तोंड उघडे ठेवून झोपतात. त्यामुळे त्यांच्या घसा कोरडा पडतो. यामुळे प्रचंड प्रमाणात लहान  लागू शकते. 

मद्याचे अतीप्रमाण

ज्यांना ड्रिंक्स घ्यायची सवय असते किंवा कधी जास्ती प्रमाणात मद्य घेतले गेले तर सतत लघवीला जाऊन शरीरातील पाणी खूप कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री हमखास तहान लागते. 

 
औषधांचे अतिप्रमाण

जर आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधे सुरु असतील तर या औषधनमुळे आपल्याला रात्री तहान लागू शकते. स्टिरॉईड, अँटी डिप्रेसंट, अँटीसायकोटिक किंवा इनहीबिटंन्ट्स ह्या औषधांमुळे शरीराला पाण्याची गरज जास्ती वाटू शकते.. 


डायबेटीसचे लक्षण

डायबिटीस झाला असेल तर आपले शरीर, साखर नीट पचवू शकत नाही. किडण्या सुद्धा लघवीतली साखर वेगळी करण्यासाठी अति परिश्रम घेतात.. ह्या प्रोसेस मध्ये सतत लघवी येते.. आणि त्या मार्फत शरीरातील बरेच पाणी उत्सर्जित होत राहते.. ह्यामुळे देखील आपल्याला खूप तहान लागू शकते.

प्री – मेनोपॉझ किंवा मेनोपॉझची लक्षणे

शरीरातील रिप्रोडक्शन करण्यात मदत करणारे हॉर्मोन्स शरीरातील फ्लूइड्स ची मात्रा समतोल ठेवण्यास मदत करतात. मेनोपॉझ किंवा प्री मेनोपॉझ दरम्यान हे हॉर्मोन बदलायला लागतात.. ज्यामुळे शरीरात उष्णता वाढणे, रात्रीचे खूप गरम होणे, गरगरून घाम फुटणे असे त्रास होतात. यामुळे आपल्याला रात्रीची खूप तहान लागते.

 
किडनी किंवा हृदयविकार 

आपल्याला किडनीचे किंवा हृदयाचे आजार झाल्यास शरीरात ऊर्जेचे प्रमाण कमी होते त्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT