Relatives are not allowed to visit VelaHari village in Nagpur district 
नागपूर

शहर म्हणजे 'कोरोना'ची उपराजधानी; माफ करा... आम्ही तुम्हाला गावात येऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण आपल्या सीमा वाढवत आहे. त्याचबरोबर शहरात रुग्णांची संख्या पाहता हे संक्रमण ग्रामीण भागातही होऊ शकते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूर शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण तयार होत आहेत. शहराला लागूनच असलेल्या वेळाहरी या गावातील ग्रामस्थांनी कोरोना संक्रमणाविरोधी पवित्रा घेतला आहे. या काळात नातेवाईक जरी गावात आले तर त्यांना ते "सॉरी, नो परमीशन' असे म्हणून गावात घेण्यास मज्जाव करीत आहेत. 

येथील ग्रामस्थांनी गावाच्या सर्व सीमा सील करून कडेकोट लॉकडाउन केले आहे. वेळाहरी गावातील प्रवेशद्वारावर बाभळीच्या काटेरी फांद्या टाकून कोरोना विरोधात ग्रामस्थांनी स्वतःची यंत्रणा सज्ज केली आहे. काटेरी झुडपांनी गावाच्या सर्व सीमा सील करून गावात कोणाला येण्यास मज्जाव दर्शविला आहे. त्यामुळे नागपुरातील लोकंच काय तर शहरातून येणारी जनावरांनाही गावात प्रवेश करू शकणार नाही, इतका कडक बंदोबस्त ग्रामस्थांनी स्वतःहून केला आहे.

शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या विक्रमी पद्धतीने वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील जनता धास्तावली आहेत. शहर म्हणजे "कोरोनाची उपराजधानी' असा शिक्‍का मारून शहरातून येणाऱ्या नातेवाइकांनाही गावात घेण्यास ग्रामस्थ तयार नाही. म्हणून शहरातून एखाद्याचे नातेवाईक आले तर त्यांना गावाबाहेरच भेटण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. 

मुख्य रस्त्यावर बोरीबाभळीचे काटे

नागपूर शहरातील कंटेनमेंट झोन परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास त्यांची रवानगी थेट विगलीकरण कक्षात केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. त्याबरोबर पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. परंतु, गावकऱ्यांनी मात्र स्वतःच्या बचावासाठी गावाच्या मुख्य रस्त्यावर बोरीबाभळीचे काटे टाकून स्वतःची सुरक्षा करून घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT