Relatives beats husband over family dispute
Relatives beats husband over family dispute 
नागपूर

कौटुंबिक वादातून नातेवाईकांनी केली पतीला मारहाण

अनिल कांबळे

नागपूर : पती-पत्नीच्या भांडणानंतर त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी महिलेच्या पतीला जबर मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर हद्दीतील गोसीया कॉलनी, उमरेड रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शेख जावेद शेख रहमान (वय ३४) व त्यांची पत्नी यांच्यात १८ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद झाला. त्यांच्यात आपसी समझोता करण्यासाठी शेख जावेदच्या पत्नीने तिची मावस बहीण नाजमा हिला बोलावले.

दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असताना शेख जावेद आणि त्याच्या पत्नीची नाजमासोबत बाचाबाची झाली. दरम्यान, नाजमाने कॉल करून तिचा पती आरोपी सिराज उर्फ बंटी शेख (रा. रामकृष्णनगर, दिघोरी, नागपूर) याला बोलावले. येताना आरोपी सिराजने त्याच्या ऑफीसमधील पाच ते सहा जण सोबत घेतले आणि शेख जावेद शेख रहमानचे घर गाठले.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

त्यांनी जबरदस्तीने शेख जावेदच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ केली व मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जावेदने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मित्रांना आणले सोबत

पती-पत्नीच्या भांडणानंतर समेट घडवून आणण्यासाठी पत्नीने नातेवाईकांना बोलावले. दरम्यान, नातेवाईकांशी भांडण झाले. वाद वाढत असल्याचे पाहून मावस बहिणीने पतीला बोलावले. ऑफीसमधून येताना त्याने पाच ते सहा जण सोबत घेतले आणि शेख जावेद शेख रहमानचे घर गाठले. ‘तेरे को समजता नही क्या, मेरे बीबी क्यो झगडरहा है’ असे म्हणत महिलेच्या पतीला जबर मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT