relatives of dead patient damaged hospital as demand for money in Nagpur  
नागपूर

"बिल भरा अन्यथा मृतदेह देणार नाही" रुग्णालयानं मागणी करताच नातेवाइकांचा राडा; केली तोडफोड   

अनिल कांबळे

नागपूर ः उपचारादरम्यान महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी छावणी येथील व्हिनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे तोडफोड केली. ही घटना आज दुपारी घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी संगीता समुन्द्रे नावाच्या ४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी त्याच दिवशी व्हिनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे भरती केले होते. दवाखान्यात भरती करतेवेळी १५ हजार रुपये डिपॉझिट केले होते. महिलेवर उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी महिलेचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी महिलेचा मृतदेह मागितला असता डॉक्टरांनी मृतदेह देण्यास नकार दिला. 

उपचाराचे बिल भरा अन्यथा मृतदेह देणार नाही, अशी भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने घेतली. त्यानंतर मृतदेह मनपाच्या ताब्यात देण्यात येईल असे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. नातेवाइकांनी दवाखान्यावर दगडफेक करून काऊंटरच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

 हॉस्पिटल प्रशासनाने सदर पोलिसांना ही माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. दरम्यान, व्हिनस हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची तर कुणी करंट लागल्याने मृत्यू झाल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरविली होती. आग किंवा करंट लागल्याने कुणाचाही मृत्यू झाला नसून कोरोनामुळे सदर रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT