file
file 
नागपूर

विद्यार्थ्यांसाठी दिलासा, संकटकाळात शिष्यवृत्तीचा आर्थिक आधार

सुधीर बुटे

काटोल (जि.नागपूर)  :  सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत तालुक्‍यातील 162 शाळेतील 3,558 विद्यार्थ्यांना 45,14,500 रुपये शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात लगेच जमा होणार आहे. कोरोना राष्ट्रीय संकटात पालकांना याचा लाभ मिळणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावयाचे असल्याची अधिकृत माहिती सूत्राकडून प्राप्त झाली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला तालुक्‍यातील शाळांना शुभवार्ता मिळाली.

मुख्याध्यापकांच्या खात्यात पैसे
या शिष्यवृत्तीचे पैसे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात वळते करण्यात आलेले आहेत. या शिष्यवृत्तीमुळे कोरोना संकटात आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात मिळाला आहे. मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण जात होती. यावर्षी शासकीय आदेशानुसार ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती फॉर्म भरल्यामुळे लवकर शिष्यवृत्ती मिळाली. मागील शैक्षणिक सत्राची शिष्यवृत्ती यावर्षी देण्यात आलेली आहे. वर्ग 1 ते 4 करिता 1000 रुपये तर 5 वर्ग ते 7 करिता प्रतिविद्यार्थी 1500 रुपये व वर्ग8 ते 10 करिता 2000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होते.

गोवारी आदिवासींना प्रथमच लाभ
सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीमध्ये गोंड जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत होता. पण, गोवारी समाज वंचित होता. मात्र, सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार गोवारी जमातीला आदिवासी दर्जा दिल्यामुळे प्रथमच गोवारी विद्यार्थ्यांना हा शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.

ओबीसी शिष्यवृत्तीपासून वंचित
एकीकडे शासनाने आदिवासी शिष्यवृत्ती ऑफलाइन केली. जात प्रमाणपत्राची आवश्‍यकता नव्हती. मुख्याध्यापकांच्या बोनाफाईड प्रमाणपत्रानुसार जमात ग्राह्य धरली. दुसरीकडे या वर्षीपासून सुरू झालेल्या इतर मागास संवर्ग शिष्यवृत्तीकरिता जातीच्या प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्यात शाळेचा व पालकांना मानसिक त्रास झाला. अद्यापपर्यंत ओबीसी शिष्यवृत्ती मिळाली नाही.

आनंदाची बाब
डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे आनंदाची बाब आहे. शासनाने जास्त कागदपत्रांची मागणी न करता मुख्याध्यापकांच्या बोनाफाईड प्रमाणपत्रावर जमात ग्राह्य धरावी.
राजेंद्र रामहरी टेकाडे
मुख्याध्यापक,
जि. प. प्राथमिक शाळा, आलागोंदी

तरच शैक्षणिक प्रवाहात येईल !
अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. ही जमात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याने जात प्रमाणपत्राअभावी हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शासनाने बोनफाईड प्रमाणपत्राच्या आधारे सरसकट आदिवासी सुवर्णमहोत्सव शिष्यवृत्ती द्यायला हवी तरच ही जमात शैक्षणिक प्रवाहात येईल.
मारोती मुरके
गोवारी जमातीचे अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT