corona virus 
नागपूर

अरे बापरे! संशयितांचा उपचार करताना डॉक्टरलाच लागण झाल्याचा संशय...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत असताना मेयोतील विषाणू प्रयोगशाळेत तपासणीची सोय झाली. मात्र, प्रत्यक्ष उपचाराची जबाबदारी सांभाळत असलेल्या मेडिकलमध्ये कोरोना विषाणूच्या संशयित वॉर्डात उपचार करणाऱ्या निवासी डॉक्‍टरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. यामुळे खळबळ उडाली आहे.

या निवासी डॉक्‍टरला तत्काळ निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. निवासी डॉक्‍टरसह मेडिकलमध्ये 19, तर मेयोत 5 संशयित रुग्ण भरती आहेत. बुलडाण्यातील संशयिताचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मेयोत एका कोरोनाग्रस्तासह मेडिकलमध्ये तीन कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयापासून तर जिल्हा प्रशासन 24 तास तैनात आहे. यामुळेच रविवारीदेखील जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मेडिकल, मेयोतील कोरोना संशयितांसाठी तसेच कोरोनाग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डांची पाहणी केली. 
उपराजधानीत 4 कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे सध्या साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. चार रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना दरदिवशी दाखल करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी मेयोत एक तर मेडिकलमध्ये दोन वेगवेगळे स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

सर्व रुग्ण एकाच वॉर्डात ठेवण्यात येत असल्याचे वृत्त दै. सकाळमध्ये प्रकाशित झाल्यांनतर मेडिकलमध्ये पेईंग वॉर्डात कोरोनाग्रस्त रुग्णांची सोय करण्यात आली आहे. इतर वॉर्डांत वेगवेगळ्या ठिकाणी लक्षणे असलेले संशयित आणि संपर्कात आलेल्यांवर उपचार सुरू आहेत. रविवारी द्वितीय वर्षाचा निवासी डॉक्‍टर कोरोना संशयित असल्याची बाब समोर आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला सर्दी व खोकला तसेच कोरोनाची इतर लक्षणे दिसून आली. 

कोरोनाग्रस्तांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद
मेडिकल प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने निवासी डॉक्‍टरला दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठवले. दुसरीकडे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी मेडिकल आणि मेयोत संशयितांसह कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. कोरोनाग्रस्तांना तसेच नातेवाइकांना धीर देण्याचे काम जिल्हाधिकारी ठाकरे यांनी या वेळी केले. मेडिकलमधील वॉडीतील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. मेयोत नमुने तपासण्याची सोय असलेल्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (मेयो) केंद्राला भेट दिली. जिल्हा प्रशासनाकडून सुरू केलेल्या सोयींसह इतर निर्णयांची माहिती दिली. रुग्णांसह उपचारादरम्यान येणाऱ्या समस्या जाणून घेत रुग्णांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना दोन्ही रुग्णालयांच्या प्रशासनाला दिली. या वेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्यासह मेडिकलच्या पाहणीदरम्यान अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उपअधीक्षक डॉ. कांचन वानखेडे, तर मेयोतील निरीक्षणात अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. रवी चव्हाण, डॉ. सागर पांडे उपस्थित होते. 

आमदार निवासात जिल्हाधिकाऱ्यांची भेट 
दै. सकाळमध्ये "आमदार निवासातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाल्यांनतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आमदार निवासात भेट दिली. विदेशातून येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांना येथे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सोय नसून, डॉक्‍टरांची व्यवस्था नसल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत रविवारी सायंकाळी ठाकरे यांनी आमदार निवासाला भेट दिली. या वेळी विलगीकरण कक्षाची पाहणी न करता फक्त येथील कॅन्टीनला भेट दिली. अस्वच्छतेबाबत कॅन्टीन चालकाला धारेवर धरले. डॉक्‍टर नसल्याने कॅन्टीन चालकालाच डॉक्‍टरची व्यवस्था करण्यास सांगितले. या खासगी डॉक्‍टरांचा खर्च देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Highway traffic jam : पुणे–कोल्हापूर महामार्गावर वाहतूक कोंडी, सांगलीच्या येलूर फाट्याजवळ ट्रक उलटला

BJP claims on Rahul Gandhi-Video: ''राहुल गांधींच्या निवासस्थानी रचला गेला ‘AI’ समिटला बदनाम करण्याचा कट'' ; भाजपचा गंभीर आरोप!

IPL 2026 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सला धक्का! १४.२० कोटींचा फलंदाज मॅच सुरू असताना अचानक जमिनीवर कोसळला, झाली गर्दी अन्... Video

Ishwarpur Patchwork : ईश्वरपुरात प्रारंभाचा नारळ फोडण्यावरून हमरीतुमरी; नगराध्यक्षांच्या हस्ते, पॅचवर्कच्या कामास सुरुवात

Latest Marathi News Live Update : अभिनेता सोनू सूद साईचरणी नतमस्तक

SCROLL FOR NEXT